शिरुरला कोणी तहसिलदार देता तहसिलदार

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): तब्बल वर्षभराहून अधिक काळ शिरूर तहसिल कार्यालयात प्रभारी तहसिलदारांमुळे नागरीकांची विविध संकलनाची कामे रखडली असून शिरूरला कोणी तहसिलदार देता का तहसिलदार अशी म्हणण्याची वेळ शिरुर तालुक्यातील नागरीकांवर आली आहे.

प्रभारी तहसिलदार नागरीकांना विविध कामांसाठी तारीख पे तारीख देत असून त्यामुळे नागरीकांना तहसिल कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. तरीही कामे होत नसल्याने नागरीक मेटाकुटीस आले असून काम त्यांची कामे न झाल्याने आधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर त्यांना वाद घालावा लागत आहे.

शिरुरला अतिरीक्त चार्ज असल्यामुळे मुळ चार्ज असलेल्या ठिकाणच्या कामांमुळे प्रभारी तहसिलदारांना शिरूर कार्यालयात बऱ्याचदा यायला जमत नाही. त्यामुळे शिरुर तहसिल कार्यालयात तहसिलदार दाखवा बक्षिस मिळवा, अशी उपहासात्मक टिका ही होत आहे. तसेच प्रभारी तहसिलदारांनी सुनावणी घेऊन फाईल बंद करुनही गौण खनिज, १५५च्या केसेस, व तक्रार केसेसचे निकाल अद्यापपर्यंत दिले नाही.

शिरुरच्या तत्कालीन तहसिलदार यांची त्यांनी मोठा भ्रष्ट्राचार केल्याप्रकरणी विविध सामाजिक कार्यकर्त्यानी वरीष्ठांकडे तक्रारी केल्याने त्यांची तडकाफडकी बदली झाली होती. त्यानंतर थोडया कालावधीसाठी आलेल्या लेडीज प्रभारी तहसिलदार यांच्यावरही लाललुचपत विभागाने गुन्हा केल्याने शिरुर मधील खाबुगिरी चव्हाट्यावर येवून महीलांनी आम्हीही पैसे खाण्यात कोठेही कमी नाही हे दाखवून दिले आहे. या सर्व प्रकारांमुळे शिरुर तहसिल कार्यालयाची प्रतिमा मलिन झाली असून ती सुधारण्यासाठी शिरुरकर प्रभारी तहसिलदारांऐवजी चांगल्या आधिकाऱ्याची वाट पाहत असून जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.