भ्रष्टाचार केलेल्या ‘त्या’ तत्कालीन तहसिलदारांवर कारवाईची शक्यता…?

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात गेल्या 2 वर्षभरात तत्कालीन तहसिलदारांनी वाळूचा मोठ्यात मोठा गौण खनिज आर्थिक घोटाळा केला होता व शासणाचा कोटयावधी रुपयांचा महसुल बुडवला होता. यासाठी वरिष्ठांकडे सखोल चौकशी करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन प्रसंगी उपोषण व शिरुर तालुका डॉट कॉमने पुराव्यानिशी बातम्यांद्वारे सडेतोड लिखाण करुन पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु होती.

वरीष्ठांच्या खातेनिहाय चौकशीनुसार व सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर तहसिल कार्यालयात चक्क 5 दिवस तत्कालीन तहसिलदार यांनी दिलेले अनेक बोगस आदेश, निकाल यांची दप्तर शोधाशोध होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपुर्द केले आहे. त्यामुळे तत्कालीन तहसिलदार यांच्यावर येत्या महीनाभरात मोठी कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी आपल्या पाठीमागे लागलेल्या ससेमिऱ्यातून सुटका होण्यासाठी अंधश्रद्धेतून आपल्या केबिनला चक्क बोकडाचा नैवेदय दाखवला होता. अखेर तो बोकड पावला नसल्याचे दिसून येत असून त्यांच्या पुढे कारवाईची टांगती तलवार ऊभी राहीली आहे.

तत्कालीन तहसिलदार यांची भ्रष्ट्राचारामुळे अचानक तडकाफडकी बदली झाल्यानंतर प्रभारी तहसिलदार म्हणुण रंजना उंबरहांडे यांनी चार्ज घेतला होता. परंतू नागरीकांच्या गेले अनेक वर्षापासून शिरुर तहसिल कार्यालयातील रस्ता केसेस, पुर्नवसनच्या, कलम -१५५ अंतर्गत चुक दुरुस्तीच्या, गौण खनिज, रस्त्याच्या केसेस अश्या विविध संकलनाच्या फाईलवर निकाल दिले गेले नाही. त्याही मागील एवढा मोठा भ्रष्ट्राचार पाहून निकाल न देता प्रभारी असल्यामुळे निघून गेल्या.

त्यानंतर प्रशांत पिसाळ यांनी प्रभारी तहसिलदार यांनी चार्ज घेतला. मागील कारभार पाहील्यानंतर त्यांनीही गौण खनिज, १५५, पुर्नवसन इ. प्रलंबित प्रकरणांवर माहीती घेण्याचे काम सुरु असल्याने तालुक्यातील नागरीकांवर वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ असून काम होत नसल्याने सबंधित असणाऱ्या टेबलच्या कर्मचाऱ्यांबरोबर काम मार्गी लागत नसल्याचे वाद होत असून विविध संकलनाच्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे.

त्यामुळे तहसिल कार्यालयाला लवकरात लवकर तहसिलदार व बऱ्याच दिवसांपासून २ रिक्त असणाऱ्या जागी नायब तहसिलदार मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. गेले 2 वर्षापासून नागरीक अनेक हेलपाटे मारत असून प्रभारी तहसिलदार तारीख पे तारीख देत आहे. नायब तहसिलदारांची 3 पदे असताना 2 रिक्त जागा भरल्या गेल्या नसल्याने स्नेहा गिरीगोसावी ह्या एकटया तीनही पदांचा कार्यभार सांभाळत आहे.