मांडवगण फराटा (संपत कारकूड ) : महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांना गावपातळीवर पायाभूत सुविधा मिळण्यासाठी अमलात आणलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उमेदवार निवडीसाठी सरकारकडून ‘ऑनलाइन सेवे’ला हरताळ फासून ‘ऑफलाइन सेवे’ला प्राधान्य देण्यापाठीमागचे गौडबंगाल समोर येताना दिसत आहे. शिरूर तालुक्यातून प्रत्यक्ष “पात्रता’ असतानाही “अपात्र’ ठरलेल्या असंख्य उमेदवारांमध्ये या निवडीबाबत संशय व्यक्त केला जात असून या निवडी मध्ये समान संधी नाकारण्याचा प्रयत्न होत आहे.
आपले सरकार सेवा केंद्रासाठी पुणे जिल्ह्यात 27 मार्च 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑफलाइन ठेवण्यात आल्यामुळे तसेच छाननी व पात्रतेच्या प्रक्रियेबाबत प्रत्यक्ष पाडताळणी नसताना केवळ डॉक्युमेंट द्वारे सादर केलेल्या माहितीच्या आधारावर पात्र-अपात्र याद्या ठरवणे यामध्ये मोठी चूक होत आहे. गावामध्ये प्रत्यक्ष सेवा केंद्र नसताना, माहिती देऊन पात्र यादीमध्ये नाव कसे? प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि डॉक्युमेंट द्वारे सादर केलेली माहितीमध्ये मोठी तफावत आहे. केवळ ऑफलाईन माहिती घेऊन हे निदर्शनास येऊ शकत नाही. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया राबवण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनामध्ये आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व शंका निर्माण झाले आहे. या निवडीमध्ये पारदर्शकतेचा अभाव व आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता व्यक्त केली जात असून, अर्जाची छाननी कागदपत्रांची पाडताळणी आणि पात्र ठरवण्याचे निकष उघड व पारदर्शक नसल्यामुळे अपात्र उमेदवारांमध्ये शंका निर्माण करीत आहेत. यादी तयार करताना केवळ मर्जीतील लोकांचीच पात्रता केली गेल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुणवत्ता पात्रता या निकषांपेक्षा वशिलेबाजी व मर्जीला प्राधान्य दिले जात असल्याचा गंभीर आरोप अपात्र उमेदवाराकडून केला आहे. ही निवड प्रक्रिया धोरणांशी विसंगत आहे.
View this post on Instagram
इतर जिल्ह्यांचा यशस्वी ऑनलाइन प्रयोग…
आपल्या शेजारील अहिल्यानगर जिल्ह्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया राबवून अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रता दाखवण्यात आली असताना त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्यातही हीच प्रक्रिया हीच प्रणाली लागू करून निवड करणे सहज शक्य असताना ऑफलाइन प्रक्रिया राबवण्याचे नेमके कारण काय ? याचे नेमके कारण काय? कोणाच्या हितासाठी ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एम.पी.एस.सी परीक्षेनंतर “आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये महाघोटाळा उघडीस येण्याची दाट शक्यता असून याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
(क्रमश:)
शिरूर! लाचखोर हवालदार गजाआड; मात्र लाचखोरीच्या ‘वरिष्ठ सूत्रधारां’चा शोध सुरु…
Video! सणसवाडीतील फोसेको इंडिया कंपनीत भीषण अपघात; पल्पर मशीनमध्ये अडकून परप्रांतीय मजूर गंभीर जखमी…
Video; शिरुर अन श्रीगोंदा महसुल विभागाचा वाळू माफियांना दणका; आठ सेक्शन अन नऊ फायबर बोटी फोडल्या
शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…