लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार केल्याने युवती गरोदर, आरोपीस अटक

मुख्य बातम्या

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथे राहणाऱ्या एका मुलीशी ओळख करुन, मैत्री करुन प्रेमसंबंध प्रस्तापित करत लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करत मुलगी गरोदर राहिल्यानंतर मित्राच्या मदतीने तिचा गर्भपात करण्यासाठी तिला परावृत्त करुन तसेच लग्न न करताच पळुन गेल्याने रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात संबंधित पिडीत युवतीने फिर्याद दाखल केल्याने 1) चेतन जालींदर कदम रा. रांजणगाव गणपती (मुळ रा.कराड, जि.सातारा) आणि 2) निवृत्ती रामकिसन कळसे (वय 24) रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे (मुळ रा. एकदरा, ता.माजलगाव जि. बीड) या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत युवती हि रांजणगाव MIDC त खाजगी कंपनीत नोकरीला असुन पिडीत युवती आणि आरोपी चेतन कदम याची मार्च 2022 दरम्यान ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने पिडीत युवतीस लग्नाचे आमिष दाखवत मार्च 2022 ते 19 सप्टेंबर 2022 कालावधीत वेळोवेळी तिच्याशी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याने ती युवती गरोदर राहिली. त्यानंतर चेतन कदम याने त्याचा मित्र निवृत्ती कळसे याच्या मदतीने पिडीत युवतीच्या पोटातील गर्भ पाडण्याकरीता गोळया खाण्यास दिल्या. तसेच तिला शिरुर तसेच अहमदनगर येथील खाजगी दवाखाण्यात पोटातील गर्भ पाडण्यास घेऊन गेला. परंतु दवाखान्यात गर्भपात करण्यासाठी लग्नाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता असल्याने आरोपीने दि 27 सप्टेंबर 2022 रोजी अहमदनगर येथील कोर्टात लग्न करण्याबाबत नोंदणी केली. परंतु आरोपी लग्न न करता पळुन गेला होता.

त्यामुळे पिडीत युवतीच्या तक्रारीवरुन रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन आरोपी चेतन जालिंदर कदम याला पोलिसांनी आज (दि 16 ) रोजी अटक करुन शिरुर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस गुरुवार (दि 20) ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.