Anjali Gaikwad

अंजली गायकवाड आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल होण्यास विलंब का…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथील अंजली गायकवाड (वय ३३) आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल का होत नाही? एखाद्या महिलेने आत्मत्येचे पाऊल उचलल्यानंतरही कारवाई होत नसेल तर नक्कीच प्रकरण दाबले जात आहे. एखाद्या महिलेचा जीव जात असेल आणि पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत असतील तर शिरूर तालुक्यासाठी ही नक्कीच गंभीर बाब आहे, अशा चर्चा शिरूर तालुक्यात रंगल्या आहेत.

शिरुर तालुक्यातील एका महिलेला लज्जास्पद अपशब्द वापरुन विनयभंग केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या विरोधात त्या महिलेने पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण तसेच गृहमंत्री यांच्यासह इतर कार्यालयात लेखी तक्रार केली होती. त्यानंतर त्या महिलेवर दबाव आणण्यासाठी शिरुर तालुक्यातील काही महिला संघटना पोलिस निरीक्षक राऊत यांच्या बचावासाठी पुढे आल्या होत्या. तसेच या महिलांनी राऊत हे किती कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. असे भासवले होते. मग आता सुसाईड नोट पोलिसांच्या हातात मिळूनही गुन्हा का दाखल होत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

पोलिस कशाची वाट पाहात आहेत?

अंजली गायकवाड यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. मग, पोलिस कशाची वाट पाहात आहेत? एखादा जीव गेल्यानंतरही पोलिस कारवाई करत नसतील तर खरंच आवघड परिस्थिती आहे, असा प्रश्न नागिरक उपस्थित करत आहेत.

गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश…?

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एका महिलेला मारुन पेट्रोल ओतून जाळण्यात आले होते. त्या महिलेच्या खुनाचा तपास लावण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. शिरुर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल झालेले अनेक महिने उलटूनही त्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यास शिरुर पोलिसांना यश आले नाही. तसेच शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असूनही पोलिस त्याकडे जाणीवपूर्वक का दुर्लक्ष करत आहेत? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिरुर पोलिसांना नारीशक्ती संघटनेचे निवेदन…

शिरुर येथील नारीशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष शारदा भुजबळ यांनी याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे निवेदन देऊन अंजली गायकवाड यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असुन या निवेदनात त्यांनी सदरच्या प्रकरणामुळे महिला वर्गामध्ये भीतीचे व दडपशाहीचे वातावरण तयार झाले असून अंजली यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा नोंद करुन कारवाई करावी. तसेच या घटनेचा लवकरात लवकर छडा लावून सुसाईड नोट मधे असणाऱ्या गोष्टीचा खुलासा करावा. तसेच सदरच्या महिलेस ज्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करुन समाजामध्ये पोलीस यंत्रणेवर असणारा विश्वास कायम करावा. तसेच सदरच्या महिलेस न्याय मिळणेसाठी शर्तीचे प्रयत्न करावे असे म्हटलेले आहे.

अंजली गायकवाडच्या आत्महत्येचे आम्हा सर्वांना दुःख आहे. अंजली गायकवाडचे आई वडिल, कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पुढे येऊन या प्रकरणात जर फिर्याद दिली; तर पोलीस देखील दोषींवर गुन्हा दाखल करतील, शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्याशी माझी सकारात्मक चर्चा झाली आहे.
_ तृप्ती देसाई, अध्यक्षा, भूमाता ब्रिगेड

1 thought on “अंजली गायकवाड आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल होण्यास विलंब का…?

  1. Karan policenchya aei bahiniwar atyachar nahi hot na mg te kashala sirious ghetil shirur police station madhe firyadi pesha aropichi baju ghetali jate documents court kade purawale jat nahi shirur police nich ahet

Comments are closed.