आई वडिलांची स्मृती प्रत्येकाने जपावी; हरिष येवले

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रत्येकाने कार्य करत आपल्या आई वडिलांच्या स्मृती देखील प्रत्येकाने जपल्या पाहिजे, असे मत उद्योजक हरिष येवले पाटील यांनी व्यक्त केले.

विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भोसेवस्ती येथे कै. रमेश काळूराम शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणच्या निमित्ताने शिंदे परिवाराकडून गावासाठी कमान तसेच प्रवचन शेडचे लोकार्पण नुकतेच उद्योजक हरिष येवले पाटील व धानोरे ग्रामपंचायत सदस्या वैशाली येवले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आमचे मामा कै. रमेश शिंदे यांनी अनेक सामाजिक कामे केलेली असून आपली चांगली पिढी घडवण्याचे काम केले त्यांच्या शिकवणीमुळे शिंदे परिसरातील सदस्य चांगल्या पदांवर काम करत आहेत.

आपल्या वडिलांनी आपल्याला घडवलेले असल्याने त्यांच्या स्मृती आपण जपल्या पाहिजे या हेतूने शिंदे परिवाराने गावात कै. रत्नाबाई रमेश शिंदे प्रवेशद्वारचे तसेच कायमस्वरूपी प्रवचन शेडचे लोकार्पण केले असल्याची बाब देखील कौतुकास्पद असल्याचे देखील उद्योजक हरिष येवले पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी शिंदे परिवारातील सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. तर यावेळी पुण्यस्मरण निमित्ताने ह.भ.प. माऊली महाराज पठाडे यांचे कीर्तन तर पूनम नळकांडे यांचे प्रवचन देखील संपन्न झाले आहे.