shirur-instagram

www.shirurtaluka.com चे अल्पावधीतच Instagram वर दहा हजार फॉलोअर्स…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

राज्यातील शिरूर तालुक्याची पहिली वेबसाईट; १४ वर्षांपासून अखंड सेवा

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्याचा आवाज म्हणून ओळख असलेल्या www.shirurtaluka.com या वेबसाईटने डिजिटल माध्यमांच्या विश्वात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अल्पावधीतच या वेबसाईटच्या अधिकृत Instagram पेजने १० हजार फॉलोअर्सचा टप्पा पार केला असून, वाचकांचा आणि नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच या यशाचे मोठे गमक ठरत आहे.

www.shirurtaluka.com ही शिरूर तालुक्यातीलच नव्हे, तर राज्यातील शिरूर तालुक्याची पहिली वेबसाईट म्हणून ओळखली जाते. राज्याचे विधान सभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते २६ मे २०११ रोजी मंत्रालयात वेबसाईटचे उद्घाटन झाले आहे. पत्रकार संतोष धायबर यांनी या वेबसाईटची निर्मिती केली असून, तेजस फडके वेबसाईटचे संपादक आहेत. उपसंपादक किरण शेलार-पिंगळे, पत्रकार अरुणकुमार मोटे, संपत कारकूड, सुनिल जिते, योगेश शेंडगे, अर्जुन शेळके, अक्षय टेमगिरे, ओंकार भोरडे या टीमच्या जोरावर गेल्या १४ वर्षांपासून वेबसाईटचा आलेख दिवसेंदिवस उंचावताना दिसत आहे. शिरूर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विकासात्मक घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे टीम करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

डिजिटल युगात बदलत्या माध्यमांशी जुळवून घेत वेबसाईटने सोशल मीडियावरही भक्कम उपस्थिती निर्माण केली आहे. विशेषतः Instagram या लोकप्रिय माध्यमावर अल्पावधीत मिळालेला १० हजार फॉलोअर्सचा टप्पा हा वाचकांचा विश्वास आणि विश्वासार्ह पत्रकारितेची पावती मानली जात आहे. तालुक्यातील ताज्या बातम्या, फोटो, व्हिडीओ, जनहिताच्या घडामोडी आणि सामाजिक विषयांवर आधारित पोस्ट्समुळे पेजला मोठा प्रतिसाद मिळत आहे. www.shirurtaluka.com या वेबसाईटचे डेलिहंटवरही मोठ्या संख्येने वाचक आहेत. शिवाय, फेसबुक, युट्यूब, ट्विटर, ई-पेपर आणि Instagram वरही मोठे चाहते आहेत.

गेल्या १४ वर्षांच्या प्रवासात www.shirurtaluka.com ने कोणत्याही राजकीय किंवा वैयक्तिक दबावाशिवाय वस्तुनिष्ठ आणि लोकाभिमुख पत्रकारिता जपली आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील नागरिक, युवक, विद्यार्थी, व्यापारी वर्ग तसेच तालुक्याबाहेर राहणारे शिरूरकरही या वेबसाईटशी जोडले गेले आहेत. Instagram वर मिळालेल्या या यशाबद्दल अनेक वाचक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आगामी काळात वेबसाईट आणि सोशल मीडिया माध्यमांद्वारे आणखी वेगवान, विश्वासार्ह आणि लोकहिताच्या बातम्या देण्याचा संकल्प व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

एकूणच www.shirurtaluka.com ही वेबसाईट केवळ बातम्यांचे माध्यम न राहता, शिरूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा आणि लोकांच्या प्रश्नांचा प्रभावी आवाज बनत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमी नंतर रस्त्याच्या दुरुस्तीच काम सुरु…

शिरूर! शिक्षिकेचा पती पालकावर भडकला; पाहा दोन्ही Video…

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!