karde-karegaon-road

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमी नंतर रस्त्याच्या दुरुस्तीच काम सुरु…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके): ‘करडे–कारेगाव रस्त्यावर तब्बल ३०० खड्डे’ असे वृत्त www.shirurtaluka.com ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याला खडबडून जाग आली आणि त्यांनी तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या अनेक कामगारांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ चे आभार मानले आहेत.

करडे–कारेगाव रस्ता झाला खड्ड्यांचा मार्ग; एक-दोन नव्हे तर तब्बल ३०० खड्डे

एक, दोन नव्हे… तब्बल ३०० खड्ड्यांनी भरलेल्या करडे–कारेगाव रस्त्यावरुन प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले होते. हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा झाला होता. रांजणगाव औद्योगिक वासहतीत टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जाणाऱ्या हजारो कामगारांना रोजच्या प्रवासात जीव मुठीत धरुन प्रवास करण्याची वेळ आली होती.

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने याबाबत सडेतोड वृत्त प्रसिद्ध केल्याने प्रशासनाची झोप उडाली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. स्थानिक तरुणांनीही काम दर्जेदार व्हावे, अशी मागणी केली आहे.

यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे बापुसाहेब शिवले म्हणाले, गेले सहा महिने या रस्त्यावर आम्ही जीव मुठीत धरुन प्रवास करत होतो. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ च होती. परंतु ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीनंतर तातडीने रस्त्याच काम सुरु झाले आहे.

नगरपरिषद, नगरपंचायत, ZP नंतर सरपंच निवडणूक; देता येणार २ मते…

Video; घोड धरणात वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट पुन्हा उध्वस्त, तरीही वाळू उपसा सुरुच

Video; शिरुर; वनमंत्री तालुक्यात असतानाच बिबट्याचा दिवसाढवळ्या १० शेळ्यांवर हल्ला

शिरुर; रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टला ‘ब’ वर्ग दर्जा; फटाके वाजवत आनंदोत्सव

छत्रपती संभाजीनगर ते पुणे नव्या महामार्गाचा मॅप व्हायरल…