शरीरातील वाढतं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

आरोग्य

आपलं शरीर फीट ठेवण्यासाठी आणि नवीन कोशिका तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. पण जेव्हा हेच कोलेस्ट्रॉल शरीरात प्रमाणापेक्षा जास्त होत असेल तर हाय बीपी, डायबिटीस आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. चुकीची लाइफस्टाईल आणि शारीरिक हालचाल कमी केल्याने आजकाल लोकांना जास्त कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. जर तुम्हालाही हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर चार घरगुती उपायांनी तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

कोथिंबिरीच्या बीया

कोथिंबिरीशिवाय भारतात कोणतीही भाजी तयार होत नाही. जास्तीत जास्त भाज्यांमध्ये याचा वापर केला जातो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही कोथिंबिरीच्या बियांचा वापर करू शकता. फार कमी लोकांना माहीत आहे की, कोथिंबीर एक आयुर्वेदिक औषधी आहे. कोथिंबिरीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड आढळतं. याचं सेवन केल्याने बॉडी डिटॉक्सची प्रक्रिया म्हणजे शरीरातील खराब तत्व शरीरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया वेगाने होते. ज्यामुळे वाढत असलेलं कोलेस्ट्रॉल कंट्रोल होतं.

शरीरात वाढत असलेला कफ रोखणं गरजेचं

शरीरात कफ वाढत असेल तर कोलेस्ट्रॉलची समस्या वाढू लागते. यामुळे खोकला, सर्दी आणि ताप या समस्या होतात. अशात व्यक्तीच्या शरीरातील कफ कमी करणं गरजेचं असतं. यासाठी रोज असा आहार घ्या ज्यात चिकटपणा आणि मसाले कमी असतील. जर तुम्ही आहारात बदल केला तर कोलेस्ट्रॉल आपोआप नियंत्रित होईल.

मेथीच्या बियांचा फायदा

मेथीही एक खाण्याची डिश आहे. मेथीच्या बीया औषधी म्हणूनही वापरल्या जातात. मेथीच्या बियांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट, अॅंटी डायबिटीक आणि अॅंटी इन्फ्लेमेटरी गुण भरपूर प्रमाणात असतात. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई भऱपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत असलेल्या लोकांनी मेथीच्या बियांपासून पदार्थांचं सेवन केलं पाहिजे.

नियमितपणे योगा करा

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी योगा करण्याला फार महत्व आहे. जर शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर तुम्ही प्राणायाम, शीर्षासन, मयूरासन सारखी आसने करू शकता. ब्रीदिंग एक्सरसाइज करूनही तुमची समस्या कमी होऊ शकते. त्याशिवाय तुम्ही हर्बल उत्पादनांचाही वापर करू शकता. असं केल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळू शकते.

(सोशल मीडियावरून साभार)