पोटातील गॅसच्या समस्येने त्रस्त आहात? हे घरगुती उपाय सुरु करा…

आरोग्य

स्वादिष्ट भोजन हे प्रत्येकाच्याच आवडीचा विषय असतो. अनेकजण खाण्यापिण्याचे शौकिन असतात. मात्र प्रमाणापेक्षा जास्त झाले की अनेकांना पोटात गॅसची समस्या जाणवते.

गॅस झाल्यास केळी खावे…

केळीचा उपयोग अ‍ॅसिडिटीवर किंवा गॅसवर उपाय म्हणून केला जातो. अ‍ॅसिडिटी रोखण्यासाठी केळीचा चांगलाच उपयोग होतो.

जेवणात लवंगाचा केला…

लवंग आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. शिवाय याचे इतर अनेक फायदे असतात. गॅस कमी करण्याचे काम लवंग करते.

भाजलेले जीऱ्याचे पाण्यात सेवन…

जिरे हे एक अ‍ॅसिड न्यूट्रलायझर आहे. जिऱ्यामुळे फक्त पचनाला मदत मिळत नाही तर पोटदुखीवर देखील आराम पडतो.

दालचीनीचा चहा प्यावा…

दालचीनी हा एक मसाला आहे जो स्वादाबरोबरच अनेक फायदेदेखील देतो. हा नैसर्गिकरित्या पचनसाठी देखील हा उपयुक्त असून पोट शांत ठेवण्यासाठी फायदेशीर असतो.