पिंपळाच्या पानाचे आयुर्वेदिक उपाय…

आरोग्य

पोटदुखी:- पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खा. पोटदुखीवर आराम मिळेल.

अस्थमा:- पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करा. आणि हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा खा. अस्थमा दूर होण्यास नक्कीच मदत होईल.

साप चावल्यावर:- विषारी साप चावल्यावर पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस दोन थेंब घ्या आणि त्याची पाने चावून खा. त्यामुळे विषाचा परिणाम कमी होण्यास मदत होईल.

त्वचारोग:- पिंपळाची कोवळी पाने खाणे त्वचेच्या रोगांवर उपचारात्मक ठरते. पावलांना भेगा पडणे पिंपळाच्या पानांचा रस भेगा पडलेल्या पावलांवर लावणे, लाभदायी ठरते.

रक्ताची शुद्धता:- १-२ ग्रॅम पिंपळ बीज पावडरमध्ये मध मिसळून रोज दोन वेळा घेतल्याने रक्त शुद्ध होते.

बद्धकोष्ठता:- पिंपळाची ५-१० फळे रोज खाल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो.

डोळ्यांचे दुखणे:- पिंपळाची पाने दुधात बुडवून डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचे दुखणे कमी होते.

दातांचे दुखणे:- पिंपळ आणि वडाच्या झाडाची साल घेऊन त्याचे एकत्र मिश्रण बनवा. हे मिश्रण गरम पाण्यात उकळवून त्याने गुळण्या केल्यास दातदुखी दूर पळेल.

(सोशल मीडियावरुन साभार)