लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

आरोग्य

1) लसणाचा वापर करताना पूर्णच्या पूर्ण पाकळी न वापरता त्याचे बारीक तुकडे करुन किंवा ठेचून लसूण वापरावा. त्यामुळे स्वाद तर चांगला लागतोच पण त्यातील उपयुक्त घटक योग्य प्रमाणात शरीराला मिळतात.

२) आपण एखाद्या पदार्थाला फोडणी टाकल्यानंतर लसूण सोलायला किंवा चिरायला घेतो. मात्र असे न करता लसणाचे काप करुन ठेवावेत आणि साधारण १० मिनीटानी तो फोडणीत किंवा कोणत्याही पदार्थात घालावा. यामुळे लसणातील एलिनोज नावाचे एंझाइम अॅक्टीव्हेट होते मग त्याचे एलिनिन आणि एलिसिनमध्ये रुपांतर होते. प्रत्यक्षात शरीराला एलिसिनचीच जास्त आवश्यकता असते.

३) लसूण कापून काही वेळ ठेवल्यानंतर त्यामध्ये एजोइन नावाचे एंझाइम अॅक्टीव्हेट होते, ज्यामुळे कोरोनरी आर्टरी डिसिज कमी होण्यास मदत होते.

लसूण खाण्याचे फायदे…

१) लसणामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते त्यामुळे इम्युनिटी बूस्टर म्हणून लसणाचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.

२) लसणात अँटीबायोटीक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल असे बरेच गुण असतात, त्यामुळे हवा बदल झाला की आवर्जून लसूण खायला हवा.

३) रिकाम्या पोटी १ पाकळी लसूण खाल्ला तर शरीराला त्याचे बरेच फायदे मिळतात.

४) पोटाच्या बऱ्याच समस्यांसाठी लसूण फायदेशीर असतो, पचनाची समस्या असेल आणि पोटात गॅसेस होत असतील तर अवश्य लसूण खायला हवा.

५) काही व्यक्तींनी विशिष्ट आजार असतील तर लसूण न खाण्याचा सल्ला दिला जातो, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही फायदेशीर असते.

(सोशल मीडियावरुन साभार)