eggs

अंडी उकडताना फुटत असतील तर पुढील टिप्स जरूर वापरा…

आरोग्य

कडक उकडलेले अंडे खायला आवडत असतील किंवा अंड्याची करी बनवण्यासाठी पूर्णपणे अंडे उकडण्याची गरज असते. आपण ते पाण्यात टाकून थोडा वेळ उकळतो. पण अनेक वेळा असे घडते की अंडी उकडण्यासाठी पाण्यात टाकताच ते फुटतात. अंडे फुटू नये यासाठी पुढील उपाययोजना नक्की करून पाहा…

अंडी उकडण्याच्या या समस्येवर मात करायची असेल तर शेफचे तंत्र शिकू शकता. वास्तविक सोशल मीडियावर शेफ अनिरुद्ध सेठी यांनी अंडी उकडण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे सांगितले. अनेक छोट्या-छोट्या टिप्स शेअर करत त्यांनी अंडी उकडण्याची योग्य पद्धत सांगितली.

अंडी उकडण्याची पद्धतशेफ अनिरुद्ध सेठी यांनी सांगितले की, अनेकजण अंडे उकडण्यापूर्वी गॅस चालू करतात आणि नंतर त्यात पाणी गरम करतात आणि पाणी गरम झाल्यावर त्यात अंडी घालतात. प्रत्यक्षात ही पद्धत योग्य नाही. अंडी उकळता तेव्हा प्रथम अंडी पॅनमध्ये ठेवा आणि नंतर त्यात पाणी घाला. परफेक्ट अंडे उकडण्यासाठी पाण्यात 1 चमचा मीठ गरम होताच टाका. यासोबत या पाण्यात एक लिंबू पिळून घ्या. लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ऍसिड आणि मिठात असलेले सोडियम एकमेकांवर प्रतिक्रिया देतात.

परिणामी अंड्याचे कवच कडक होते. अंड्याचे कवच जड झाल्यावर ते फोडणे व सोलणे अगदी सोपे होते. जर तुम्हाला अंडी कडकपणे उकडायची असेल तर घड्याळ पाहा आणि 12 मिनिटे गॅसवर उकळू द्या. हे अंडे तुम्ही एग करी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या करीमध्ये वापरू शकता. पण जर तुम्ही अंडी खाण्यासाठी शिजवत असाल तर तुम्ही ते फक्त 10 मिनिटे उकडले पाहिजे. अशा प्रकारे त्यांना सोलणे सोपे होईल.

(सूचना : संबंधित माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. www.shirurtaluka.com यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

रात्री झोप येत नाही तर मग हा उपाय नक्की करा

टाच दुखीवर घरगुती उपाय

जायफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

हा चहा पावसाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेईल