जायफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

आरोग्य

जायफळाचा वापर हा विविध मिठाईंमध्ये केला जातो

मिठाईमधील स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. जायफळाची चव ही स्वादिष्ट तर असतेच, मात्र त्याच्या औषधीय गुणधर्मांसाठी आणि विविध फायद्यांसाठी ते अधिक ओळखले जाते.

इन्सोमनिया अर्थात निद्रानाशासाठी

इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश या समस्येवर जायफळ प्रभावीपणे काम करते. निद्रनाश म्हणजे रात्री झोप न लागण्याची समस्या होय. दिवसभर काम, घर आणि बाहेरच्या गोष्टींमुळे तणावाची समस्या निर्माण होते आणि परिणामी झोप न येण्याची समस्या आपल्याला उद्भवते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जायफळाचे सेवन करणे हे खूप फायदेशीर ठरू शकते. याच्या प्रभावामुळे झोप न येण्याच्या समस्येवर मात करता येते. त्यासाठी, झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूधात चिमूटभर जायफळ मिसळून प्यायल्याने झोप चांगली लागते.

पचनक्रिया सुधारण्यासाठी

तुमची पचनक्रिया मंदावली असेल तर तुम्ही अन्नाचे चांगले पचन होण्यासाठी जायफळाचा उपाय जरूर करावा. तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी तसेच, पोटाचे विकार जसे की, डायरिया, पित्त होणे इत्यादी समस्यांवर मात करण्यासाठी जायफळाचे सेवन करावे. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यात मदत होईल.

पेनकिलरच्या स्वरूपामध्ये

स्नायूंमध्ये वेदना होणे आणि ओटीपोटात दुखणे या समस्या दूर करण्यासाठी जायफळ फायदेशीर आहे. सांधे आणि स्नायूंच्या वेदनांसाठी जायफळ हा उत्तम पर्याय आहे. जायफळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, अँटीइनफ्लेमेट्री गुण आणि औषधी गुणधर्म हे दुखण्यापासून आपल्याला आराम मिळवून देतात. जायफळच नाही तर स्नायू किंवा सांधेदुखीवरही जायफळाच्या तेलाचा वापर करता येतो.

संधिवातासाठी लाभदायी

वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होऊ लागतात. अनेकांना सांधेदुखीचा त्रासही होतो. अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीपासूनच आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. संधिवात झाल्यावर शरिरावर सूज येणे आणि सांधे ठणकणे असा त्रास सुरू होतो. जायफळाचे सेवन केल्यास किंवा त्याचे तेल लावल्यास सांधेदुखीची सूज आणि वेदना दूर होतात. जायफळातील गुणधर्मांमुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो.

कॅन्सरपासून बचाव करण्यास 

सध्याच्या काळात दुर्दैवाने कॅन्सर हा एक अतिशय घातक आजार झाला आहे. आपण सर्वजण अशा एखाद्या व्यक्तीला ओळखतो, ज्यांनी कर्करोगाशी लढा दिला आहे. गेल्या काही वर्षांत अनेक सिनेतारकांनाही कॅन्सरची लागण झाली आहे. कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी योग्य जीवनशैली आणि उत्तम आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

अनेकदा घरगुती उपायांमुळेही कर्करोगाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. जायफळ हा त्याच घरगुती उपायांपैकी एक आहे. जायफळामध्ये असलेले आवश्यक तेल अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते आणि कर्करोग टाळू शकते. अभ्यासानुसार, जायफळ त्याच्या अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांमुळे पोटाच्या कर्करोगापासून आपले संरक्षण करू शकते.

मधुमेहावर प्रभावी

मधूमेह हा देखील आजच्या जगात एक सामान्य आजार झाला आहे. केवळ वृद्धच नाही तर तरुण आणि लहान मुलेही या आजाराशी झुंज देत आहेत. या स्थितीत वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही जायफळाचे सेवन करू शकता. जायफळ हा ट्रायटेरपेन्सचा समृद्ध स्रोत मानला जातो. ट्रायटरपेन्समध्ये मधुमेहाविरोधी गुणधर्म असतात, जायफळ हे टाईप-2 मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते.

निरोगी दातांसाठी 

चांगल्या आरोग्यासाठी दातांची काळजी घेणे, अतिशय गरजेचे आहे. जास्त साखर, सोडा किंवा कॉफीचे सेवन केल्याने दात किडणे आणि दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत दातांची काळजी घेणे गरजेचे आहे. दातांच्या अनेक समस्यांसाठी जायफळ खूप फायदेशीर ठरू शकते. जायफळ हे अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्माने समृद्ध आहे आणि हे दातांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.

डोळ्यांसाठी फायदेशीर

लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींना या सर्वांनाच डोळ्यांच्या समस्या कधी ना कधीतरी उद्भवतात. अशा परिस्थितीमध्ये, योग्य वेळी लक्ष देणे आणि आपल्या डोळ्यांची काळजी घेणे महत्वाचे आहे. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जायफळाचे सेवन करणे हे फायदेशीर ठरू शकते. जायफळाचे सेवन केल्याने प्रोस्टाग्लॅंडि नावाच्या हार्मोनचे उत्पादन नियंत्रित करून डोळ्यांच्या समस्या कमी केल्या जाऊ शकतात.

तणाव दूर करण्यासाठी गुणकारी  

आजकाल जवळपास प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या प्रकारचा ताण असतो. यापासून लहान मुलेही सुटलेली नाहीत. तणावामुळे अनेकांना पॅनिक अटॅकचाही त्रास होतो. अशा परिस्थितीमध्ये जायफळ किंवा जायफळाच्या तेलाचे सेवन करणे हे फायदेशीर ठरू शकते. जायफळामध्ये अँटीकॉन्व्हलसंट गुणधर्म असतात, जे तणाव कमी करून मेंदूतील रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर

चांगल्या आरोग्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे. असे न झाल्यास ती व्यक्ती लवकर आजारी पडू शकते. हवामानात थोडासा बदल होताच बरेच लोक आजारी पडतात किंवा सर्दी-खोकल्याला बळी पडतात. कारण, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर जायफळाचे सेवन केले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होईल. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात..

कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी

कॉलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत, चांगले कॉलेस्ट्रॉल आणि वाईट कॉलेस्ट्रॉल. जेव्हा शरिरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागते तेव्हा अनेक समस्या सुरू होतात. सतत थकवा जाणवणे, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका, किडनीच्या समस्या, दृष्टी कमी होणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. जायफळाचे सेवन केल्यास कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यात असलेल्या इथॅनॉलिकचा अर्क कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. परंतु, जायफळाचे सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

वजन कमी करण्यासाठी मदत करते

आजकाल लठ्ठपणा ही जवळजवळ प्रत्येकाची समस्या झाली आहे. तणाव, हार्मोनल असंतुलन, वारंवार बाहेरचे खाणे, अवेळी खाणे आणि शारिरिक व्यायामाचा अभाव ही काही त्यामागची कारणे आहेत. अशा स्थितीमध्ये वर्कआऊट्स आणि हेल्दी डाएट सोबतच तुमच्या स्वयंपाकघरातून काही मसाले मदत घेण्यात काही गैर नाही. जायफळ हा देखील असाच एक मसाल्याचा प्रकार आहे, जो वजन कमी करण्यात मदत करतो. जायफळाच्या सेवनाने वजन बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.

जायफळाचा उपयोग तुम्ही अनेक प्रकारे करू शकता.

आपले स्नायू आणि सांधेदुखीमध्ये गुडघ्यांना किंवा पायांना तेल लावून मसाज करू शकता. जायफळाचा मसाला म्हणून वापर केल्यास चवीसोबतच आरोग्यही चांगले राहते.जायफळाची चव ही तिखट आणि गरम असते. जर तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही जायफळाचे सेवन करू शकता. चिमूटभर जायफळाची पावडर दूधात मिसळून सेवन केल्याने शरीराला आतून उष्णता मिळते.

जायफळ तुमच्या त्वचेसाठीही अतिशय फायदेशीर आहे. जर तुम्हाला पिंपल्स किंवा डागांची समस्या असेल तर जायफळ पावडर आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण कोरडे झाल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा एक चांगला फेस पॅक आहे.जायफळ हा एक अद्भुत मसाला आहे, ज्याचे अनेक औषधी फायदे आहेत. परंतु, त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.

(सोशल मीडियावरुन साभार)