वांगाचे, डागांचे मूळ कारण ‘शरीरातील काही बिघाड ‘असे आहे .प्रत्येकाच्या शरीरात पित्त कफ वात हे त्रिदोष संतुलित अवस्थेत असतात ,परंतु जर पित्त आणि वात बिघडले कि आपले शरीर अनेक आजारांना निमंत्रण देते.पित्त आणि वात दोष असणाऱ्यांनी पित्त वात भडकावणारे पदार्थ आहारविहारात वापरल्यास हे दोष बिघडतात आणि वांग येणे सुरु होते. स्त्री आणि पुरुष कोणालाही कधीही हे डाग चेहऱ्यावर किंवा शरीरावर येऊ शकतात. स्त्रियांच्या बाबतीत गर्भधारणेवेळी किंवा प्रसूतीनंतर संप्रेरकांच्या (हार्मोन्स)बदलामुळे वात पित्त हे दोष बळावून मग हे दोष अधिक प्रमाणात दिसायला लागतात.व चेहर्यावर वांग येते. यालाच pregnancy mark किंवा brown pigmentation म्हणतात. आयुर्वेद वांगाला मंडल किंवा नीलिका म्हणते.
२५ ते ६० वयोगटामध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जाणवतो.यालाच आपण वैज्ञानिक भाषेत melasma म्हणतो. पुरुषांमध्ये केवळ १०% हे प्रमाण दिसून येते. थायरॉईड आजारात देखील melasma वाढल्याचे दिसून येते. अगदी सोप्या भाषेत म्हणायचे झाले तर थायरॉईड ग्रंथी या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे वांग दिसू लागते.चेहऱ्याच्या वेगवेगळ्या आवरणात किंवा थरात वांग आढळून येते.प्रखर उन्हामुळे हे डाग अधिक काळे दिसतात. त्यामुळे असे डाग आलेल्या व्यक्तीने नेहमी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावूनच उन्हात जावे. ३० ते ५० एसपीएफ असलेले सनस्क्रीन सकाळी आणि दुपारी न चुकता लावावे.
उपाययोजना कोणत्या
बदाम पेस्ट, दुधाची साय व गुलाब पाणी एकत्र वाटून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग,वांग, मुरुमे जाऊन चेहरा टवटवीत व कांतीयुक्त होतो.
ताकातील लॅक्टिक अॅसिड त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करते त्यामुळे चेहरा उजळतो. ताक आणि टोमॅटोचा रस एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग,वांग कमी होण्यास मदत होईल.
गरम पाण्यात थोडी तुळशीची आणि पुदिन्याची पाने घालून चेहऱ्यावर वाफ घ्यावी.
बटाटाट्याचा वापर करुनही तुम्ही चेहऱ्यावरील काळे डाग ,वांग घालवू शकता. कच्च्या बटाट्याच्या चकत्या करुन त्या चेहऱ्यावर रगडा. काही वेळाने चेहरा धुवा.
लिंबाचा रस आणि मध वांग असलेल्या भागावर आठवडाभर लावल्यास फायदा होतो.
बटाट्यात ब्लिचिंग चे घटक असल्याने वांगवर चोळल्यास गुणकारी आहे.
काकडी रस आणि गुलाबजल लावल्याने PH संतुलित राहून वांग कमी होण्यास मदत होते.
गरम पाण्यात तुळशी ची पाने टाकून वाफ घेतल्यास वांग कमी होते.
मंजिष्ठा मधात वाटून लेप वांगावर लावावा
जायफळाचा लेप वांगावर उपयुक्त ठरतो
मसूर दुधात वाटून तूप मिसळून तयार केलेला लेप वांगावर फायदेशीर आहे.
हिमालयाचे ब्लेमीनार क्रीम यासाठी चांगले आहे.
रक्तशुद्धी साठी रक्तदोषांतक अथवा महामंजिष्ठादी काढा वापरा.
पोट साफ नसल्याने ही समस्या वाढते यासाठी पोटसाफ ठेवत जा.
पित्ताचा त्रास बळावणार नाही याची दक्षता घ्या.
वात शहरात प्रकोपीत होणार नाही यांची काळजी घ्या.
वरील उपाययोजना केल्यास ही समस्या दूर होईल.
(सोशल मीडियावरून साभार)