शुभ्र साखरेचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

आरोग्य

दैनंदिन शारीरिक क्रियांसाठी आवश्यक ४५ ते ६५ टक्के शक्ती आहारातून घेतलेल्या नैसर्गिक शर्करेद्वारे (पिष्टमय पदार्थांपासून) प्राप्त होते. धान्य, फळे, शेंगा, कंदमुळे, दूध आदींमधून हिची पूर्तता सहजतेने होते. नैसर्गिक शर्करा शारीरिक क्रियांसाठी इंधनाचे कार्य करते. यासाठी ती उपकारक असते. परंतु रिफाइंड साखर पचवण्यामध्ये शारीरिक शक्ती आणि शरिराची आधारभूत तत्त्वे यांचा अपव्यय होतो. हाडे, हृदय, मेंदू, स्वादुपिंड, यकृत इत्यादींची कार्यप्रणाली विस्कळीत होते.

१ अ. साखर आणि हाडांचे विकार

साखरेच्या पचनासाठी आवश्यक असलेले कॅल्शियम हाडे आणि दातांपासून घेतले जाते. कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचे संतुलन बिघडून हाडे ठिसूळ होऊ लागतात. त्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिस, दातांचे विकार, केस गळणे आदी समस्या उद्भवतात.

१ आ. साखर आणि मधुमेह:- साखर रक्तातील शर्करेला अतीशीघ्रतेने वाढवते. हिला शरिरात शोषून घेण्यासाठी स्वादूपिंडाच्या कोशिका इन्सुलिन सोडतात. इन्सुलिनची सतत वाढती मागणी असल्याने या कोशिका थकून जातात. यामुळे इन्सुलिनची निर्मिती न्यून होऊन मधुमेह होतो.

१ इ. साखर आणि हृद्रोग:- साखर एच डी एल् या लाभदायी कोलेस्टेरॉलला घटवून एल्डीएल् हे हानीकारक कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स यांना वाढवते. यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती जाड होऊन उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे विकार उत्पन्न होतात. लंडनचे प्रा. जॉन युडकीन म्हणतात, हृदयरोगासाठी साखरही चरबीइतकीच उत्तरदायी आहे.

१ ई. साखर आणि कर्करोग (कॅन्सर):- साखर कर्करोगाच्या कोशिकांचा परिपूर्ण आहार आहे. या कोशिका अन्य आहारीय तत्त्वांचा पुरेसा उपयोग करू शकत नाहीत. म्हणून त्यांना साखरेची आवश्यकता भासते. ज्या पदार्थांनी रक्तातील साखर तीव्रतेने वाढते, ते पदार्थ कर्करोगाच्या कोशिकांची अपरिमित वाढ करण्यास साहाय्य करतात. डॉ. थॉमस ग्रेबर यांनी हे सिद्ध केले आहे की, कर्करोगाच्या कोशिकांना आहाराच्या रूपात साखर न मिळाल्याने त्या मृत होतात.

साखरेमुळे शरिराची रोगप्रतिकारक क्षमता न्यून होते. यामुळेही कर्करोग पसरण्यास साहाय्य होते. यामुळे अन्य घातक रोगांच्या विषाणूंचे संक्रमण होण्याची शक्यतासुद्धा वाढते. मादक पदार्थांप्रमाणेच आता रिफाइंड साखरही कर्करोगाचे मुख्य कारण सिद्ध झाली आहे.

१ उ. लहान मुलांमध्ये साखरेचे दुष्परिणाम:- गोड पदार्थांच्या अतीसेवनामुळे लहान मुलांमधे अधीरता, चंचलता आणि अशांती वाढते. साखरेपासून उत्पन्न होणारी आम्ले दातांवरील संरक्षक आवरणाला (इनॅमलला) नष्ट करतात. एमोरी विद्यापिठाच्या सर्वेक्षणानुसार ज्या मुलांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक ऊर्जेचा स्रोत साखरयुक्त पदार्थ होते, त्यांच्यात हृदयाची दुर्बळता, कोलेस्टेरॉलची वाढ, जंत, लठ्ठपणा आणि इन्सुलिन प्रतिरोध (रझिस्टन्स) आढळून आले आहेत.

१ ऊ. साखरेचे इतर दुष्परिणाम:- 

अधिक साखरेमुळे शरिरात ब जीवनसत्त्वांची उणीव निर्माण होऊ लागते. यामुळे पचन आणि स्नायू यांच्याशी संबंधित विकार उत्पन्न होतात. साखर रक्ताची आम्लता वाढवून अर्धशिशी आणि त्वचाविकार उत्पन्न करते. साखरेमुळे वीर्य पातळ होऊ लागते. आहारात साखर जितकी अधिक, तितकी लठ्ठपणाची भीती अधिक.

१ ए. साखर एवढी भयंकर का?

साखरेला पांढरी आणि चमकदार बनवण्यासाठी सल्फर डायऑक्साइड, फॉस्फोरिक अ‍ॅसिड, कॅल्शिअम हायड्रॉक्साइड, अ‍ॅक्टिव्हेटेड कार्बन इत्यादी रसायनांचा वापर केला जातो. यानंतर तिला अती उच्च तापमानावर गरम करून अती शीत हवेत वाळवले जाते. या प्रक्रियेत तिच्यातील सर्वच पौष्टिक तत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि जीवनसत्त्वे नष्ट होतात. यामुळे रिफाइंड साखर एक सौम्य श्‍वेत विष (स्लो व्हाइट पॉयझन) बनते.

१ ऐ. अत्यधिक साखरयुक्त पदार्थ:- 

विविध तयार पदार्थांमध्ये असलेले साखरेचे प्रमाणात पुढे दिले आहे. हे आकडे चकित करणारे आहोत.

१ ओ. साखरेचा अतीवापर धोकादायक:- फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन (FAO)च्या सर्वेक्षणानुसार जगात दरवर्षी प्रत्येक व्यक्ती २४ किलो (प्रतिदिन ६६ ग्रॅम) साखरेचे सेवन करते. साखर कारखान्यांच्या उभारणीपूर्वी कुठेही खाद्य पदार्थांमध्ये रिफाइंड साखरेचा उपयोग केला जात नव्हता. यामुळे जुन्या काळातील लोक दीर्घजीवी आणि आयुष्यभर कार्यक्षम राहत होते. (संदर्भ : मासिक ऋषिप्रसाद)

2) रासायनिक साखरेला पर्याय म्हणजे गूळ!

गूळ बनवतांना साखरेच्या तुलनेत न्यून रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यामुळे रासायनिक साखरेपेक्षा गूळ आरोग्यासाठी लाभदायक आहे. सेंद्रिय पद्धतीने, म्हणजे कोणतीही हानीकारक रसायने न मिसळता बनवलेला गूळ किंवा साखर हे रासायनिक साखरेला पर्याय आहेत. गुळामध्ये शरिराला आवश्यक अशी खनिजेही असतात.

मानवासाठी हानीकारक असलेल्या शुभ्र साखरेच्या उत्पादनाला प्रोत्साहन देऊन जनतेच्या आरोग्याशी काही देणे-घेणे नसल्याचे सिद्ध करणारी सर्वपक्षीय सरकारे ! शुभ्र साखरेचे दुष्परिणाम ज्ञात असूनही आजपर्यंतच्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी शुभ्र साखरेच्या समस्येवर उपाय तर काढला नाहीच, उलट त्यांनी पुढील स्वार्थी कृती केल्या.

१) स्वतःच्या अधिपत्याखाली रहातील असे अनेक साखर कारखाने उघडून त्यांना जनतेच्या पैशातून सहस्रो कोटी रुपयांचे अनुदान दिले आणि नंतर त्याची लूट केली.

२)साखरसम्राट बिरूद मिरवण्यासाठी साखर उद्योगाला अनाठायी महत्त्व देऊन प्रचंड पाणी पिणार्‍या आणि जमिनीचा कस कमी करणार्‍या उसाच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे देशात ठिकठिकाणी मराठवाड्या सारखे दुष्काळी प्रदेश निर्माण झाले.