तुळशीची पान तोडून देव्हाऱ्यात ठेवताना हे ४ नियम पाळा

आरोग्य

मुंबई: हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो, असं मानलं जातं. याशिवाय तुळशीला भगवान विष्णूशी संबंधित काही बाबींमध्ये महत्व आहे. ज्या घरात तुळस लावली जाते, त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही, असे मानले जाते. हिंदू धर्माला मानणाऱ्या प्रत्येक घरात तुळशीची रोपे लावली जातात आणि सकाळ संध्याकाळ त्याची पूजाही करतात. पूजेमध्ये तुळशीची पाने तोडून देवासमोर देव्हाऱ्यात ठेवली जातात. मात्र, ही पाने तोडून देव्हाऱ्याच ठेवण्याचे काही खास नियम आहेत.

तुळशीची पाने किती ठेवावीत? आपण देव्हाऱ्यात तुळशीची दोन पाने ठेवू शकता. परंतु, अनेक श्रद्धावान मानतात की, घराच्या पूजास्थानी नेहमी 7 तुळशीची पानं ठेवली पाहिजेत. तुळशीची पाने किती दिवस ठेवावीत? धार्मिक ग्रंथानुसार तुळशीच्या रोपाला पवित्र वनस्पती मानले जाते. त्यामुळे तुळशीची पाने कितीही जुनी झाली तरी ती नेहमीच पवित्र असतात. परंतु, जर तुम्ही ती तुमच्या घरातील देव्हाऱ्यात ठेवत असाल तर दर 15 दिवसांनी आपण ती बदलू शकता. तुळशीची पाने सुकलेली आणि तुटलेली असतील तर ती देव्हाऱ्यातून काढून त्या जागी नवीन तुळशीचे पानं ठेवू शकता.

देव्हाऱ्यात कोणती तुळस ठेवावी?
तुळशीच्या वनस्पतीच्या अनेक प्रजाती भारतात आढळतात. परंतु, हिंदू घरांमध्ये तुळशीचे दोनच प्रकार लावले जातात. हे रामा तुळशी आणि श्यामा तुळशी आहेत. या दोन तुळशींपैकी कोणत्याही एका तुळशीची पाने आपण आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवू शकतो.

हे डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल. वाढणार नाही शुगर तुळस कोणत्या देवतेला अर्पण केली जाते? हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण केली जातात. श्रीकृष्णाव्यतिरिक्त देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूलाही तुळशीची पाने अर्पण केली जातात. परंतु, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान भोलेनाथ आणि श्री गणेशाला तुळशीची पाने कधीही अर्पण करु नयेत. हे ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत.