महाबळेश्वरच्या पर्यटन विभागाच्या कामांवरील स्थगिती उठवा; आदित्य ठाकरे

महाराष्ट्र

मुंबई: महाबळेश्वर येथील पर्यटन विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांवरील स्थगिती उठवून काम सुरु करण्याची मागणी शिवसेना नेते व माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

महाबळेश्वर हे महाराष्ट्र राज्यामधील महत्वपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. या पर्यटन स्थळास चालना मिळावी, त्याचा अधिक विकास व्हावा म्हणून माननीय शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन मंत्री म्हणून अनेक बैठका देखील घेतल्या आहेत.

या माध्यमातून येथील मुख्य बाजारपेठ या स्थळांच्या सुशोभीकरणाचे काम सर्व प्रथम घेण्यात आले होते. परंतु मुख्य बाजारपेठेच्या सुशोभीकरणाच्या कामास स्थगिती दिल्याचे समजले आहे. तसेच पेटीत लायब्ररी काम होण्यास विविध अडथळे येऊन संथगतीने होत आहे.