घोरण्यावर घरगुती उपाय

आरोग्य

घोरणे ही अनेक जणांची समस्या आहे. अनेक कारणांमुळे घोरण्याचा आजार होऊ शकतो.

काही सावधगिरी बाळगुन आणि घरगुती इलाज करुन घोरण्यावर नियंत्रण आणता येऊ शकते. आज आपण पाहणार आहोत अशाच काही टिप्स ज्या घोरण्याची समस्या दूर करण्यात मदत करतील.

१) पंखा किंवा एसी खाली झोपू नका.

पंखा किंवा एसीची सरळ हवा लागल्याने श्वास नलिका आकसतात.

२) भरपूर पाणी प्या:- शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे नाक आणि गळ्यामध्ये कफ वाढतो. ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते. दिवसभर ३-४ लिटर पाणी प्या.

३) योग करा:- घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी कपालभाति आणि प्राणायम फायदेशीर आहे.

४) आहारावर नियंत्रण ठेवा:- रात्रीच्या वेळी जास्त खाणे टाळा. झोपण्याआधी कफ वाढवणारे पदार्थ, जसे की दुध, ऑयली फूड, चॉकलेट किंवा गोड खाऊ नका.

५) रक्त दाबावर नियंत्रण ठेवा:- जर रक्त दाब सामान्यांपेक्षा जास्त असेल तर यामुळे घोरण्याची समस्या होऊ शकते. रक्त दाब नियंत्रणात असावा

6) वजन कमी करा:- घोरणे टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण असणे खूप आवश्यक आहे. जास्त वजन असल्याने घोरण्याची समस्या होते.

७) लसूण मोहरीच्या तेलाने मालिश:- २-३ पाकळ्या लसूण मोहरीच्या तेलात टाकून गरम करा आणि या तेलाने छातीची मालिश करा. फायदा होईल.

८) मध प्या:- रोज झोपण्याआधी एक चमचा मध प्यायल्याने गळ्याच्या रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. घोरण्याची समस्या दूर होते.

9) मिठाच्या पाण्याने गुळण्या करा:- मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने, वाहिन्यांमधील सूज बरी होते आणि घोरणे बंद होते.

१०) थंड पदार्थ खाऊ नका:- गार पाणी प्यायल्याने किंवा पदार्थ खाल्ल्याने घशाच्या वाहिन्या आकसतात. ज्यामुळे घोरण्याची समस्या होते. यापासून दूर रहा.

११) डाव्या कुशीवर झोपा:- झोपण्याची बाजू बदला. पाठ किंवा पोटावर झोपण्याऐवजी डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा.

१2) धुम्रपान सोडा:- धुम्रपान, घोरण्याचे सर्वात मोठे कारण असू शकते.

१3) नाक स्वच्छ करून झोपा:- सर्दी-पडसे किंवा धूळ-माती नाकात गेल्यानेसुद्धा श्वास घेण्यात अडचण येऊ शकते. झोपण्याआधी नाक स्वच्छ करा.

१4) गरम पाण्याची वाफ घ्या:- रात्री झोपण्याआधी गरम पाण्यात बाम टाकून वाफ घेतल्याने श्वासनलिका मोकळ्या होतात आणि घोरणे टाळता येते.

१५) कोमट पाणी पिणे:- रात्री झोपताना नियमित एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने श्वासाची नळी मोकळी होते आणि घोरण्यापासून आराम मिळतो.