चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, सुरकुत्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय…

आरोग्य

१) ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी १ चमचा दही, १ चमचा मसूरडाळ पीठ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे.

२) पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे.

३) ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा.

४) जायफळ पाण्यात उगळून पिंपल्स व डोळ्याभोवती काळी वर्तुळ असेल तर लावावे.

५) टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग व वर्तुळे कमी होतात.

६) पिंपल्स जास्त असेल तर कोबी किसुन त्यात जायफळ पेस्ट मिसळून जाडसर लेप चेहऱ्यावर देणे.

चेहऱ्यावर डाग, पिंपल्स, सुरकुत्या

७) चेहऱ्यावर पिंपल्स व पिंपल्सचे डाग असेल तर तुळशीच्या पानाचा रस १ चमचा, १ चमचा पुदीन्याचा रस व थोडे हळद पेस्ट करून हे मिश्रण पाण्यात करुन घेणे.

८) शाल्मली (काटेसावर) चा काटा उगाळून पिंपल्सवर लावणे.

९) चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर चेहऱ्यावर बाजरीच्या पिठाचा लेप देणे. चेहरा निखरतो.

१०) चेहऱ्यावर सुरकुत्या असेल तर सफरचंद किसून त्यात एक चमचा कच्चे दुध टाकुन व ही पेस्ट चेहऱ्यावर लावणे.

१२) चेहरा स्वच्छ व चमकदार होण्यासाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण, १० मिनिट पाण्यात भिजवून चेहऱ्यावर लेप देणे.

१३) चेहऱ्यावर सुरुकुत्या असेल तर त्यावर केशर व बदामची कच्च्या दुधात पेस्ट करुन लावणे.