लिंबू रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी…!

आरोग्य

लिंबू आणि लिंबाच्या साली वापर करण्यासाठी काही टिप्स

1) लिंबू कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा.

२) अजीर्ण झाल्यास लिंबू कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव मीठ घालून कोमट करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो.

3) पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत प्यावे. त्याने भूक वाढते आणि अन्न नीट पचते.

4) आरोग्य व सौंदर्य रक्षणासाठी लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून त्याने चेहरा धुवावा. कांती तेजस्वी होते आणि सुरकुत्या नाहीशा होतात. त्वचेचा रुक्षपणा निघून जातो.

5) रस काढल्यानंतर लिंबाची साल फेकून देवू नये. ती चेहऱ्यावर दोन्ही हातांनी नाजूकपणे घासावी. असे केल्याने रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि सौंदर्य खुलते.

6) लिंबाच्या सालीमध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे मुरुमापासून बचाव होतो.

7) गुडघे, कोपर काळवंडले असतील तर थोडा मध लावून लिंबाच्या सालीने त्या भागावर मसाज करावा. काळवंडलेपणा निघून जातो.

8) लिंबाच्या सालीने पायाची, हाताची नखे साफ घासल्याने, ती स्वच्छ होतात आणि त्यांना चकाकीही येते.

9) फ्रिजमध्ये दुर्गंधी येत असेल तर, लिंबाच्या साली ठेवाव्या. यामुळे दुर्गंधी कमी होते.

10) शेगडीवरचे चिकट, तेलकट डाग काढण्यासाठीही लिंबाची साल उपयोगी पडते.

11) लिंबाच्या सालीचा किस हा ‘लेमन झेस्ट’ म्हणून ओळखला जातो. सॅलेड किंवा अनेक पदार्थांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही ‘लेमन झेस्ट’चा वापर करु शकता.

12) लिंबाची साल वाळवून त्याची पावडर करून फेसपॅकमध्ये तिचा वापर करु शकता.

(सोशल मीडियावरून साभार)