अ‍ॅसिडिटी ने हैराण झालात वारंवार पोटात जळजळत तर मग हे ५ उपाय करा

आरोग्य

१) आहारात बदल व वेळेवर जेवण

अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जास्त तळलेले, भाजलेले, मसालेदार पदार्थ टाळा. जास्त वेळ उपाशीही राहू नका, तसेच प्रमाणापेक्षा जास्तही खाऊ नका.

) चहा, कॉफीवर नियंत्रण

वारंवार होणारी अ‍ॅसिडिटीची जळजळ कमी करण्यासाठी तुम्हाला चहा, कॉफी, चॉकलेट, सोडा आणि इतर कॅफिन असलेल्या गोष्टींचे सेवन टाळावे लागेल. कारण कॅफिनच्या अतिसेवनाने अ‍ॅसिडिटीची समस्या वाढू शकते.

३) धूम्रपान आणि मद्यपान टाळणे सर्वोत्तम

धुम्रपान आणि मद्यपान या दोन वाईट सवयींमुळे पोटातील आम्लाची म्हणजेच असिडची पातळी वाढते. त्याचा वाईट परिणाम आपल्या पचन प्रक्रियेवर होतो. त्यामुळे अशा वाईट सवयी टाळाव्यात.

४) व्यायाम आणि शारीरिक हालचाली

हल्ली बहुतांश लोक बैठ्या कामामुळे स्थूल होताना दिसतात. जास्त वजनामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या वाढू शकते. त्यामुळे दैनंदिन हलका व्यायाम आणि वेळोवेळी शारीरिक हालचाली याने पचन सुधारण्यास मदत होते.

५) झोप आणि शरीराला आवश्यक विश्रांती

लॅपटॉप, कॉम्प्युटवर, मोबाईलचा अतिवापर आणि इतर कामांच्या व्यापात शरीराला विश्रांती मिळत नाही. अशाने शरीरातील आम्ल वाढते. त्यामुळे शरीराला आवश्यक विश्रांती आणि शांत झोप घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.

(सोशल मीडियावरून साभार)