शरीरात या ५ गोष्टी कमी झाल्या तर हृदय पडेल बंद

आरोग्य

हृदय आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. जर ते बंद पडलं तर आपणं जिवंत राहू शकत नाही. निरोगी राहण्यासाठी हृदय चांगलं असणं गरजेचं आहे, अशात हृदयाची खूप काळजी घेणंही गरजेचं आहे. ज्याप्रकारे गेल्या काही दिवसात हृदयरोग वाढले आहेत, त्यामुळे हेल्थबाबत टेंशन वाढलं आहे.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं आहे. जर तुमचं खाणं-पिणं चांगलं असेल तर तुम्ही अनेक आजारांना दूर करू शकता. सोबतच हृदयही निरोगी ठेवू शकता. हेल्दी हार्टसाठी तुम्हाला डाएटमध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन के, मॅग्नेशिअम आणि फायबरसारख्या पोषक तत्वांचा समावेश करावा लागेल. हे पोषक तत्व कमी झाले तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

या पोषक तत्वांचा डाएटमध्ये करा समावेश

आजकाल केवळ प्रोटीन आणि व्हिटॅमिनवर फोकस केला जातो. आपल्या लोक आपल्या आहारात प्रोटीन इनटेकची खास काळजी घेतात, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या कमतरतेबाबत चिंतेत असतात, पण हेही महत्वाचं आहे की, हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही पोषक तत्वांचा डाएटमध्ये समावेश करणं गरजेचं असतं. मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, फायबर आणि कॅल्शिअम इनटेक वाढवणं गरजेचं आहे.

मॅग्नेशिअम: जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये मॅग्नेशिअमचा समावेश कराल तर तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं, ब्लड प्रेशर नियंत्रित राहिल्याने हृदयाचे ठोके नियंत्रित राहतात. जर तुमच्या शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता झाली तर हृदयरोग किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. तुम्ही आहारात हिरव्या पालेभाज्या, नट्स, लो फॅट याकूट, केळी, एवाकाडोसारख्या फळांचा समावेश करा.

पोटॅशिअम: हृदयरोगांपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. शरीरात पोटॅशिअमचं प्रमाण संतुलित ठेवणं गरजेचं आहे. पोटॅशिअम ब्लड प्रेशर आणि शरीरात तरल संतुलन ठेवण्यास मदत करतं. जर शरीरात पोटॅशिअमची कमतरता झाली तर हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

ओमेगा 3 फॅटी ॲसिड: ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड हृदय निरोगी ठेवण्यासाठी फार गरजेचं आहे. यामुळे शरीरातील सूज कमी होते. रक्ताच्या गाठी आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास हे मदत करतं. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड हृदयाची गती कायम ठेवण्यास मदत करतं. तसेच सूज आणि ट्रायग्लिसराइडची लेव्हल कमी करण्यास मदत करतं. जर शरीरात ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड कमी झालं तर हृदयरोगाचा धोका वाढतो. तुम्ही आहारात सॅल्मन फिश, टूना यांसारख्या माशांचा समावेश करू शकता.

कॅल्शिअम: शरीरात कॅल्शिअम नियंत्रित ठेवल्यावर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. कॅल्शिअमची कमतरता ब्लड प्रेशर वाढवू शकते. ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये दही, दूध, कडधान्य आणि सोयाबीनचा वापर वाढवाल तर कॅल्शिअमची कमतरता दूर होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)