गुडखे पाय कंबर खांदा दुखी वर उपाय

आरोग्य

गुडघे पाय खांदा दुखी हा उतार वयात खूप लोकांना सतावणारा आजार आहे, त्या साठी खालील घरगुती उपाय केल्यास नक्की फरक पडतो.

बाभळीची साल

1) बाभळीची साल काढायची. पाण्यात टाकुन कडक उकळवा. त्या पाण्याने गुढघे पाय किंवा खांदा दुखत असेल तिथून धुवून टाका. रोज हा उपाय केल्याने आठ दिवसात फरक पडतो.

२) जवस

२) रोज सकाळ संद्याकाळी बडी सौफ खाल्यासारखे जेवण झाल्यावर जवस खा. जवस शरीरातील वंगण सारखे काम करते, गुढघे खांदा पाय दुखी ला खूप फरक पडतो.

३) पांढरे तीळ खात जा, हाडे मजबूत होतात.

४) एरंडेल तेल

भाकरीचा गोळ्यात अर्धा चमचा एरंडेल तेल घाला.

त्याची भाकरी १५ दिवस रोज रात्री जेवताना खा. 15 दिवस करा हे, याने गुढघे पाय खांदा दुखी, कंबर दुखी बरी होते.

५) तिळाचे तेल

गुढघे पाय खांदा फारच दुखत असेल तर, तिळाचे तेल सकाळ – संद्याकाळ प्या. त्या वर कोमट पाणी प्या. 15 दिवसात गुडखे पाय खांदा दुखी थांबते.