संभाजीनगर: शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक वसाहतींमध्ये टोयोटो-किर्लोस्कर, अथर, JSW यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी आधीच जमीन संपादित केली आहे.
आता भविष्यातील उद्योग विस्तारासाठी बिडकीनजवळ आणखी १०,००० एकर भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील दोन महिन्यांत नोटीससह ही प्रक्रिया पूर्ण होणार, अशी माहिती केंद्रीय उद्योग सचिव अमरदीप भाटिया यांनी दिली.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) अंतर्गत विकसित भारत २०४७ या कार्यक्रमाअंतर्गत सचिवांनी शेंद्रा-बिडकीन परिसराची पाहणी केली आणि स्थानिक उद्योगांसोबत चर्चा केली. या वेळी राज्याचे उद्योग प्रधान सचिव पी. अनबलगन आणि ऑरिकचे MD पी. डी. मलिकनेरही उपस्थित होते.
भाटिया म्हणाले की
“नवीन उद्योगांना जागा मिळावी म्हणून बिडकीनजवळ १० हजार एकर जमीन संपादन करणार आहोत. पुढील दोन महिन्यांत नोटीस, पायाभूत सुविधा आणि एजन्सी निवड पूर्ण करू.”
स्टार्टअप्ससाठी गुड न्यूज
कृषीपूरक स्टार्टअप्सना आता NA लागणार नाही. अडचण असल्यास आम्हाला ई-मेल करा, समस्या सोडवली जाईल.