बारामती: जनतेविषयीची आपुलकी, नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याची पद्धत आणि त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची कार्यशैली पाहता, अजितदादांनंतर बारामतीकरांना हक्काचे ‘जयदादा’ मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व असलेले Jay Pawar यांनी दर गुरुवारी बारामती येथील राष्ट्रवादी भवनात जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. आज झालेला हा दुसरा जनता दरबार असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आज सकाळी ११ वाजल्यापासून राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबारास सुरुवात झाली. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत विविध समस्या आणि मागण्या मांडल्या. जनता दरबारात आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी जय पवार यांनी संबंधितांशी संपर्क साधत सकारात्मक प्रतिसाद दिला.
नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. बारामतीकरांमधून “अजितदादांनंतर आपल्याला सहज उपलब्ध, जनसामान्यांशी जोडलेले आणि हक्काचे युवा नेतृत्व मिळाले,” अशी भावना व्यक्त करण्यात येत होती.जय अजितदादा पवार यांच्या या उपक्रमामुळे नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.