महिलांनो रडायचं नाही लढायचं; श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांचा कानमंत्र

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) जेव्हा आपण पुरोगामी विचारांकडे चाललेलो असतो त्यावेळी आपल्या जबाबदाऱ्या वाढतात. स्रिया तसेच पुरुषांसाठी चारित्र्य हे सगळ्यात महत्वाचं असायला पाहिजे. महिलांनो समाज्यात तुम्हाला जस पाहिजे तस जगायला मिळालं म्हणजे त्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही चुकीच्या मार्गाने जायचं तुम्हाला सामाजिक भान असलंच पाहिजे. त्यामुळे विधवा महिलांनी समाज्यातील जुन्या चालीरिती बाजूला सारून कपाळावर कुंकू लाऊन ताठ मानेने जगल पाहिजे असा कानमंत्र कोल्हापुरच्या श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे त्या एका खाजगी कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी महागणपती मंदिराच्या सभागृहात महिलांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रांजणगाव गणपती, निमगाव भोगी तसेच अनेक परिसरातील महिला उपस्थित होत्या. यावेळी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक विधवा महिलांना युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांनी स्वतःच्या हाताने कुंकू लावल यावेळी महिलांना भावना अनावर झाल्या. त्यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे यांनी त्या महिलांच सांत्वन करत त्यांना धीर दिला आणि आता रडायचं नाही लढायचं असा कानमंत्र दिला.

त्या आल्या, त्यांनी पाहिलं अन त्यांनी जिंकून घेतलं सार…

कोल्हापुरच्या श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती या 28 वर्षांनंतर एका खाजगी कार्यक्रमानिमित्त रांजणगाव गणपती येथे शनिवार (दि 28) रोजी आल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी आपल्या भाषणात 28 वर्षांपुर्वीची एक चांगली आठवण सांगितली. युवराज्ञी संयोगिताराजे म्हणाल्या 28 वर्षांपूर्वी मी माझ आजोळ असणाऱ्या नागपुर वरुन पुण्याला जाताना माझ्या आईंना कोणीतरी सांगितलं की रांजणगाव गणपती येथे महागणपतीचं दर्शन घेऊन जावा. तुमचं सगळं कार्य छान पार पडेल. त्यावेळी आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी थांबलो होतो. कारण माझा कोल्हापुरचे श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याशी माझा साखरपुडा होणार होता. त्यामुळे मला गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने छत्रपती संभाजीराजे यांच्या सारखा पती मिळाला. त्यांच्या बोलण्यातुन त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांसह सर्व उपस्थितांची मने जिंकली.