छत्रपती संभाजीनगर शहराचा पारा ४२ पार; दुपारी १२ ते ४ ट्रॅफिक सिग्नल बंद तर मुकुंदनगर रेल्वेगेट पाच दिवस बंद

महाराष्ट्र

संभाजीनगर: उन्हाचा कहर सुरूच छत्रपती संभाजीनगर शहरातील तापमान ४२ अंशांवर पोहोचले असून, होरपळ वाढली आहे. अशातच दुपारच्या वेळेस सिग्नलवर थांबणं म्हणजे जणू गरम तव्यावर उभं राहण्यासारखे आहे त्यामुळे दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहे.

ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा मोठा निर्णय 

रखरखत्या उन्हामुळे वाहतूक पोलिसांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत सर्व सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून संध्याकाळी ४ नंतर ते रात्री ९.३० पर्यंत सिग्नल नियमित सुरू राहतील.

तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी आळीपाळीने चौकात तैनात राहणार आहेत.

पोलिसांचे आवाहन – नागरिकांनी संयम बाळगावा, नियमांचे पालन करावे.

मुकुंदनगर रेल्वेगेट पाच दिवस बंद

चिकलठाणा-करमाडदरम्यान रेल्वेमार्ग दुरुस्ती होणार असून, रेल्वेगेट क्रमांक-५६, मुकुंदनगर २३ ते २७ एप्रिल दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहील.

या काळात प्रवाश्यांनी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा 

शिवाजीनगर भुयारी मार्ग

चिकलठाणा भुयारी मार्ग

वाहतुकीचा प्रवास नियोजनबद्ध करा – उशीर टाळा

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

घराबाहेर निघण्यापूर्वी पाणी प्या

शक्य असल्यास दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळा

लहान मुलांना उन्हापासून वाचवा

छत्री, टोपी, सनग्लासेसचा वापर करा

भरपूर पाणी, लिंबूपाणी, ताक, आणि फळांचा रस घ्या

सावध राहा – सुरक्षित रहा

उन्हाळ्याची तडाखा टाळा – घराबाहेर पडताना पाणी आणि टोपी/छत्री सोबत ठेवा.