मुंबई: सोशल मीडिया हा वेगवेगळ्या आणि भन्नाट व्हिडीओंचा खजिना आहे. इथे आपल्याला धक्कादायक, आश्चर्यकारक, हसवणारे, प्राण्यांचे आणि लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पहायला मिळतात. लहान मुलांचे तर इतके क्यूट व्हिडीओ असतात की, ते सतत बघतच रहावं असं वाटतं. येथे आपल्याला मनोरंजक किंवा क्यूट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात.
सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्ही फारच भावूक व्हाल. लहान मुलं ही खूप मस्तीखोर असतात हे तर आपल्याला माहित आहे, ज्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी आई-वडिल तसेच शिक्षकांना वेगवेगळ्या युक्त्या वापराव्या लागतात.
ही लहान मुलं बऱ्याचदा अशा काही चुका करतात की, त्यांना नीट सांगितलं तरी देखील कळत नाही. अशावेळी वेगळ्या प्रकारे त्यांना त्या सांगाव्या लागतात आणि याच संबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका आणि लहान मुलगा एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. तर या दोघांच्यापाठी शाळेतील दुसरे विद्यार्थी बसलेले तुम्ही पाहू शकता.
हा व्हिडीओ शिक्षिका आणि या लहान मुलाच्या क्यूट अशा भांडणाचा आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षिका त्या लहान मुलावर रागवली आहे आणि त्याच्यासोबत आता ती बोलणार नाही असं देखील सांगत आहे. त्याचवेळी हा मुलगा मी अशी चूक करणार नाही असं या शिक्षिकेला सांगतो आणि तिच्या गालावर प्रेमाने किस देखील करतो. हा मुलगा आपल्या क्यूटनेसने आपल्या शिक्षिकेला पूर्णपणे मनवण्याचा प्रयत्न करतो. परंतु ती त्याच्यावर रागावून बसलेली आहे. या व्हिडीओने अनेकांची मन जिंकली आहेत.