gadchiroli-talathi

Video: तलाठी दारू पिऊन तर्रर्र, सातबाऱ्यावर सही करतानाच कोसळला…

महाराष्ट्र

गडचिरोली: कुरखेडा तालुक्यातील एक तलाठी दारू पिऊन तर्रर्र झाला असून, सातबाऱ्यावर सही करतानाच कोसळला आहे. संबंधित तलाठ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी आहे. मात्र तरीही जिल्ह्यात दारू पिण्याचं प्रमाण जास्त आहे. सरकारी कर्मचारीसुद्धा कार्यालयांमध्ये दारू पिऊन येत असल्याचे पाहायला मिळते. दारुच्या नशेत सरकारी कर्मचारी असल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या सजा क्रमांक ८ सोनेरांगी येथे किशोर राऊत हे तलाठी पदावर कार्यरत आहेत. गेल्या ८ दिवसांपासून ते कार्यालयात मद्यपान करून येत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. पण, या तक्रारीची दाद कोणीही घेतली नाही. तलाठी किशोर राऊत यांचा थेट व्हिडीओच सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र खळबळ उडाली आहे. यात ते दारुच्या नशेतच कार्यालयात बसल्याचे दिसतात. त्यांना आजुबाजूला काय चालले आहे हे सुद्धा कळत नाही.

सोनेरांगी गावातील काही शेतकरी शेतीविषयक कामासाठी तलाठी कार्यालयात गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी राऊत यांच्याकडे काही कागदपत्रांवर सही करण्याची विनंती केली. मात्र, दारूच्या नशेत असल्याने राऊत यांना सही करण्याची शुद्धही नव्हती. सही करता-करता अचानक राऊत हे जमिनीवर कोसळले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी त्यांना उचलून बाजूच्या खोलीत नेत एका खाटेवर झोपवले.

वाघोली तलाठी कार्यालयातील दोन खाजगी व्यक्तींवर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून केली अटक

पोलीस व तलाठी भरती सराव प्रश्न-संच

वारसाची नोंदणी करा आता घरबसल्या; जाणून घ्या…

पोलिस व तलाठी भरती सराव प्रश्न…

शिरूर तालुक्यातील त्या तलाठ्याची दप्तर तपासणी करून मुरूम उत्खननाचा फेरपंचनामा करा…

शिरुर तालुक्यात पहील्या गुन्ह्यात ताप्तुरत्या स्वरुपाचा जामिन असतानाही त्या माजी उपसरपंचाचा प्रताप