संभाजीनगर: अनेकांना माहितीच नाही पण ATM कार्ड असलेल्या खातेदारांना मिळतोय ₹10 लाखांपर्यंत अपघाती विमा
काय आहे या योजनेत खास
अपघाती मृत्यूवर मिळतो लाभ
कोणतीही प्रीमियम भरायची गरज नाही
केवळ कार्ड वापर चालू असणं आवश्यक
महत्त्वाची अट म्हणजे…
मृत्यूपूर्वीच्या ६० दिवसांत किमान एक व्यवहार (ATM / PoS / Online) केलेला असावा.
क्लेम करताना लागणारी कागदपत्र
मृत्यू प्रमाणपत्र
बँक पासबुक व कार्ड कॉपी
ड्रायव्हिंग लायसन्स
शेवटचा व्यवहाराचा पुरावा
पोस्टमार्टम रिपोर्ट (जर लागू असेल)
विमा क्लेम फॉर्म
पोलीस रिपोर्ट
विमा क्लेम कसा करायचा
जर एटीएम कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांनी 2 ते 5 महिन्यांच्या आत संबंधित बँकेच्या शाखेला माहिती द्यावी लागते. त्याच शाखेत नुकसानभरपाईचा अर्ज (Claim Form) सादर करावा लागतो.
बँक पुढील गोष्टी तपासते
मृत व्यक्तीने मृत्यूपूर्वीच्या 60 दिवसांत कोणताही आर्थिक व्यवहार (ATM/PoS/Online) केला होता का. कार्ड कोणत्या प्रकारचं आहे (RuPay, MasterCard, Classic इ.) विम्याअंतर्गत अपंगत्व किंवा मृत्यू यापैकी कोणती घटना घडली.