संभाजीनगर: राज्य सरकार तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास सोय च्या मदतीने सुरू झाले आहे Mera E-KYC अँप आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच पूर्ण करू शकता ई-केवायसी प्रक्रिया
काय आहेत या ॲपची खास वैशिष्ट्ये
घरी बसून करा सोप्या पद्धतीने ई-केवायसी
फेस ऑथेंटिकेशनमुळे होईल झटपट पडताळणी
कुटुंबातील कोणताही सदस्य करू शकतो ई-केवायसी
तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक
कशी करावी ई-केवायसी
पहिला टप्पा: ॲप डाउनलोड
Mera E-KYC Mobile अँप इथे क्लिक करून डाउनलोड करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth
Aadhaar Face RD Service Appइथे क्लिक करून डाउनलोड करा: https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd
दोन्ही ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
ॲपला आवश्यक परवानग्या (permissions) द्या.
तिसरा टप्पा: Mera E-KYC ॲपमध्ये माहिती भरा
राज्य म्हणून महाराष्ट्र निवडा.
तुमचा आधार क्रमांक टाका.
आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला otp(वन-टाइम पासवर्ड) टाका.
स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा (Captcha) अचूकपणे भरा.
चौथा टप्पा: चेहऱ्याने करा पडताळणी
मोबाईलचा समोरचा कॅमेरा (front camera) सुरू करा आणि तुमचा चेहरा व्यवस्थित स्कॅन करा.
स्क्रीनवर जशा सूचना येतील, त्याप्रमाणे तुमच्या डोळ्यांची उघडझाप करा.
जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी ई-केवायसी करत असाल, तर *मागील कॅमेरा (back camera) वापरा.
पाचवा टप्पा: पडताळणी पूर्ण
तुमची पडताळणी यशस्वी झाली की, लाभार्थ्याची माहिती रास्त भाव दुकानाच्या ई-पॉस मशीनवर दिसेल.खात्री करण्यासाठी ॲपमधील “E-KYC तपासा. जर तिथे E-KYC Status – या असे दिसत असेल, तर तुमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे!
अत्यंत महत्त्वाची माहिती
Maharashtra ही सुविधा फक्त *महाराष्ट्रामधील लाभार्थ्यांसाठीच आहे. जे लाभार्थी महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झाले आहेत, त्यांनी IMPDS KYC या पर्यायाचा वापर करावा.
लक्षात ठेवा, ई-केवायसी करण्याची *शेवटची तारीख ३० एप्रिल २०२५ आहे.
रास्त भाव दुकानदारांना विनंती
सर्व शिधापत्रिकाधारकांना मदत करा आणि लवकरात लवकर त्यांची ई-केवायसी पूर्ण करा, जेणेकरून कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्नापासून वंचित राहावे लागणार नाही.