Skip to content
बुधवार, जून 17, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

पंतप्रधानपदावर राहून कोणते आश्वासन पूर्ण केले याचा हिशोब द्यावा

महाराष्ट्र
नोव्हेंबर 9, 2024नोव्हेंबर 9, 2024शिरूर तालुका टीम

नागपूर: काँग्रेस पक्षाने जनतेला दिलेल्या आश्वसनांची नेहमीच पूर्तता केली. युपीए सरकारनेही मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार, शिक्षण हक्क कायदा दिला. आताही काँग्रेस पक्षाने हिमाचल प्रदेश, कर्नाटक व तेलंगणातील जनतेल्या दिलेल्या गॅरंटींची पूर्तता यशस्वीपणे केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आकडेवारीसह स्पष्ट सांगत नरेंद्र मोदींनी १२ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री व ११ वर्ष पंतप्रधानपदावर राहून कोणते आश्वासन पूर्ण केले याचा हिशोब द्यावा असे आव्हान दिले.

नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, कर्नाटकात गृहज्योती योजनेअंतर्गत २०० युनिट वीज मोफत दिली जात असून त्यासाठी ९६५७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यातील आतापर्यंत ५१६४ कोटी रुपये खर्च केले आहेत. शक्ती योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस प्रवासासाठी ५०१५ कोटी रुपयांची तरतूद केली असून २१०९ कोटी आतापर्यंत खर्च झाले आहेत. गृहलक्ष्मी योजनेसाठी महिलांना प्रति महिना २००० रुपये दिले जात असून २८ हजार ६०८ कोटी रुपयांची बजेटमध्ये तरतुद केलेली आहे. या योजनेवर आतापर्यंत १३ हजार ४५१ कोटी खर्च झाले आहेत. अन्नभाग्य योजनेसाठी बीपीएल कुटुंबासटी ८०८० कोटींची तरतूद केली असून यातून २५८२ कोटी खर्च केले आहेत, बेरोजगार तरुणांसाठी युवानिधी योजनेअर्तंगत ६५० कोटी तरतूद आहे, त्यातून १०८ कोटी खर्च केले आहेत. पंतप्रधान मोदी सातत्याने खोटे बोलत आहेत. त्यांच्याकडे काही यंत्रणा नाही का, काहीही न पाहता, कोणतीही माहिती न घेता ते सर्रास खोटे बोलत आहेत.

भाजपाचे नेते भडकाऊ भाषण देत मुळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहे. भाजपाने विकास कामे सांगून व थेट मत मागावे. योगी आदित्यनाथ यांच्या, बटेंगे तो कटेंगे, हा नारा आरएसएसला आवडतो. त्याच्याविरोधी नरेंद्र मोदींनी, एक है तो सेफ है चा नारा सुरु केला. मोदी व योगी बसून नेमका कोणता नारा द्यायचे ते ठरवावे. मारनेवाले, बांटनवाले तुम्हीच आणि दुसऱ्यांना बचेंगे तो कटेंगे सांगतात. देशाच्या एकतेसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले. भाजपाच्या कोणी बलिदान दिले ते सांगा? मोदी हे खोटं बोल पण रेटून बोल या नितीचा अवलंब करतात असेही खर्गे म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात भाजपाने त्यांचे सर्व मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते सर्वांना कामाला लागले आहे. पण जनता आता त्यांना साथ देणार नाही. महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी मविआचे सरकार आणा असे आवाहनही खर्गे यांनी केले. आज नागपुरात आल्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी दीक्षाभूमिवर जाऊन अभिवादन केले.

Tagged accountfulfilledPrime Ministerpromiseswhile

पोस्टचे नॅव्हिगेशन

धारावी पुनर्विकास विरोधामागे दलित आणि कष्टकऱ्यांचा द्वेष करणारी प्रवृत्ती
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळवणे झाले आता सोपे; जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत…

संबंधित पोस्ट

जर्मनीची कुशल मनुष्यबळाची मागणी महाराष्ट्र पूर्ण करणार

जून 13, 2023शिरूर तालुका टीम

अपघातातील जखमींच्या बचाव आणि मदतकार्यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न

जानेवारी 22, 2025जानेवारी 22, 2025शिरूर तालुका टीम

लुटारू आणि दरोडेखोर गँग विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांचे जोरदार आंदोलन

जुलै 16, 2025शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई
  • ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
  • पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या
  • तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम
  • पालक भाजीचे गुणधर्म

Popular Categories

  • आरोग्य (2,270)
  • इतर (152)
  • क्राईम (1,642)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (365)
  • मनोरंजन (167)
  • महाराष्ट्र (4,904)
  • मुख्य बातम्या (2,102)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (963)
  • शिरूर तालुका (2,765)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ... Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई
  • ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
  • पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या
  • तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम
  • पालक भाजीचे गुणधर्म

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!