एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होत असाल तर ही काळजी घ्या अन्यथा…

महाराष्ट्र

मुंबई: बँक मोठं कर्ज देताना अनेक वेळा जामीनदाराची मागणी करते. बँका 2 प्रकारचे जामीनदार मागतात. एक म्हणजे गैर-आर्थिक हमीदार आणि दुसरा आर्थिक हमीदार. पहिल्यामध्ये तुमचा वापर फक्त संवादासाठी केला जाईल. तर दुसऱ्या प्रकरणात कर्जदाराने पैसे न भरल्यास तुमच्याकडून वसुली केली जाईल.

ज्या व्यक्तीसाठी तुम्ही गॅरेंटर बनत आहात त्या व्यक्तीला तुम्ही चांगलं ओळखता का, हे पाहा. तसेच त्याच्या कर्ज परतफेडीच्या हिस्ट्रीवर एक नजर टाका. त्यापूर्वी कर्जाची माहितीही घ्या. कर्जाचा जामीनदार बँकेला हमी देतो की कर्जदार कर्जाची परतफेड करेल. कर्जदार असे करण्यात अयशस्वी झाल्यास, हमीदार म्हणून मी कर्जाची परतफेड करेल.

नियमानुसार कर्जाला तुम्ही जामीनदार झाले आहात तर त्याने वेळेत कर्जाचे हप्ते भरले नाही तर त्यावेळी कर्जाची परतफेड म्हणून तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तो डिफॉल्टर होऊ शकतो. जर कर्जदार लोन डिफॉल्टर झाला तर त्याचा क्रेडिट स्कोअर खराब होईल. तसेच तुमच्या स्कोअरवरही परिणाम होईल. तुमच आर्थिक नुकसान होऊ शकत अशा परिस्थितीत तुम्ही पैसे घेतले नसले तरी विचित्र परिस्थितीमुळे तुम्ही धोक्यात येऊ शकता.

तुम्हाला भविष्यात कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. विमा काढून घ्या ज्यांच्यासाठी तुम्ही कर्जाचे जामीनदार होत आहात त्याला कर्जाचा विमा उतरवण्यास सांगा. कोणत्याही कारणाने कर्जदाराचा मृत्यू झाल्यास किंवा अन्य घटना घडल्यास कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी विमा कंपनीची असते. अशा प्रकारे तुमची अडचण वाढत नाही.