जयंत पाटील यांचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात; रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरींचा संताप

महाराष्ट्र

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीविषयी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात वाद उडाला आहे. जयंत पाटील म्हणाले होते की, “उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी १५ दिवसांनी झाला असता, तर काय घडले असते?”यावर प्रतिक्रिया व्यक्त करत रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “जयंत पाटील यांचे विधान महाराष्ट्रातील महिलांना किंवा राज्याला गरजेचे नाही. त्यांनी अशा प्रकारच्या मळमळीपासून दूर राहावे.”

आमदार अमोल मिटकरी यांनीही संताप व्यक्त करत सांगितले, “मी पूर्वी जयंत पाटील यांचा आदर करायचो, परंतु सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी संदर्भात केलेले वक्तव्य आणि अहंकारी भाषा आता असह्य वाटते.”राजकीय वर्तुळात या विधानामुळे चर्चेला गती मिळाली असून, विरोधकांनी जोरदार प्रतिक्रिया नोंदवली आहे.