हर्सूलमध्ये १५० मालमत्तांवर फिरणार जेसीबी; बघा कोणत्या मालमत्ता होणार बाधित

महाराष्ट्र

संभाजीनगर: हर्सूलमध्ये जाणारा जुना जळगाव रोड आता २०० फुटांचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी नगररचना विभागाने मोजणी आणि मार्किंग सुरू केले असून, सुमारे १५० मालमत्ता पाडण्यात येणार आहेत.

हर्सूल टी पॉइंट ते पाझर तलावापर्यंतचा रस्ता रुंद करणार

महापालिकेच्या पथकाने मंगळवारी (१५ जुलै) सकाळीच हर्सूलमध्ये येऊन रस्त्याचा केंद्रबिंदू निश्चित करून दोन्ही बाजूंनी ३० मीटरची मोजणी केली. मार्किंगच्या वेळी अनेक नागरिकांनी विरोध दर्शवला, मात्र कर्मचाऱ्यांनी समजावून सांगत काम पूर्ण केले.

कोणत्या मालमत्तांवर कारवाई होणार

६५ निवासी,

४५ व्यवसायिक

४० मिश्र प्रकारच्या मालमत्ता

बाधित होणार असून व्यावसायिक मालमत्तांवर लवकरच जेसीबी फिरणार असून, निवासी मालमत्तांसाठी न्यायालयाने १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.

मालमत्ता वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ

मार्किंग होताच अनेक व्यावसायिकांनी आपली दुकानं, स्टॉल्स काढण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, अनेक जण आपल्या घराची कागदपत्रं घेऊन महापालिकेचे उंबरठे झिजवत आहेत.