मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मुलुंड विभागात कुसुमाग्रज जयंती साजरी     

महाराष्ट्र

मुंबई: दर वर्षी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहलायाच्या मुलुंड विभागातर्फे येथे ग्रंथालायच्या जागेत मुलुंड येथे कुसुमाग्रज जयंती/ मराठी भाषा दिन  साजरा होतो. यावर्षी या कार्यक्रमात कार्याध्यक्ष शं रा पेंडसे यांच्या ”सत्पत्री दान या कथासंग्रहाचे प्रकाशन कोणाही ”सेलिब्रेटी”च्या हस्ते न करता मुलुंड विभागाचे कार्यवाह महेश कवटकर यांच्या हस्ते करून एक नवीन पायंडा पाडला.

याप्रसंगी मुंबई मराठीग्रंथसंग्रहालया च्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षा अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री मावळणकर आणि युगंधरा वळसांकर यांनी ”नटसम्राट”नाटकातला कावेरी आणि नट सम्राट हा प्रवेश मोठ्या ठसक्यत सादर केला .प्रा. जोशी  यांनी नाटकासंबद्धी छोट्या -मोठ्या गोष्टी सांगितल्या. कार्यवाह नुलकर यांनी (ज्या सध्या परदेशात आहेत) एक कविता रेकॉर्ड करून पाठवली होती ती ऐकविली.