संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-अंकाई या ९२ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण वेगाने सुरू असून, त्यासाठी गंगापूर, वैजापूर व संभाजीनगर तालुक्यातील शेतजमिनींचे अधिग्रहण सुरू झाले त्यात सुमारे ३५० शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत.
हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरू
जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून हरकती मागवण्यात येत असून, मिटमिटा, माळीवाडा, बनेवाडी, वंजारवाडी, वाघलगाव, परसोडा, चांडगाव, पानवी खंडाळा, बेंदवाडी, वाघलगाव, खडक नारळा, फतियाबाद, तलेसमन, सावंगी, दायगाव, रोटेगाव, लासूरगाव, परसोडा, चांडगाव, पानवी खंडाळा, बेंदेवाडी आदी गावांतील शेतजमिनींचा समावेश आहे.
कामाचा वेग आणि प्रगती
दुहेरीकरणाचे काम दोन टप्प्यांत राबवले जात आहे
अंकाई ते करंजगाव
करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर
या दोन्ही टप्प्यांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, ३० किमी पर्यंत सपाटीकरण पूर्ण झाले आहे. सध्या १० पुलांवर कामे सुरू आहेत.
रेल्वेची क्षमता दुप्पट होणार
सध्या एकेरी मार्ग 115% क्षमतेने कार्यरत असून, दुहेरीकरण झाल्यानंतर ही क्षमता 143% पर्यंत वाढणार आहे.
औद्योगिक मालवाहतूक, प्रवासी रेल्वे, आणि दळणवळणासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या प्रकल्पाचा फायदा या भागातील ९८ लाख लोकसंख्येला व ३८ गावांना होणार आहे.
दुहेरीकरण झाल्यानंतर या मार्गावरून अवजड मालवाहतूक; तसेच औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतुकीला मोठी मदत होईल.
प्रकल्प पूर्णत्वाची अपेक्षित तारीख – डिसेंबर २०२६
या महत्वाकांक्षी कामासाठी दोन ठेकेदार नियुक्त करण्यात आले असून, त्यांनी वेळेत काम पूर्ण केल्यासच नियोजित मुदतीत प्रकल्प पूर्ण होऊ शकेल.