राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने महाराष्ट्र द्वितीय स्थानी

महाराष्ट्र

विविध श्रेणीत 6 पुरस्कार पटकावले

मुंबई: पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध श्रेणींमध्ये 45 पुरस्कारांपैकी प्रत्येकी सात पुरस्कारांसह ओडिशा आणि त्रिपुरा संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर आहेत. सहा पुरस्कारांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर तर आंध्र प्रदेश चार पुरस्कारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. बिहार आणि हिमाचल प्रदेशने प्रत्येकी तीन श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत.

सन 2022 ते 2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून कामकाज बघत असतांना केलेल्या विविध एकात्मिक विकासाभिमुख नियोजनामुळे ग्रामविकास विभागास राष्ट्रीय पातळीवर एकुण 6 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मी पुरस्कार प्राप्त सर्व ग्रामपचांयत, पंचायत समिती तथा संस्था यांचे मनापासून अभिनंदन करतो. या ही पुढे अशीच उत्कृष्ट कामगिरी होईल अशी अपेक्षा करतो.

पंचायती राज मंत्रालयाकडून दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत संस्थांना राष्ट्रीय स्तरावर विविध श्रेणींमध्ये पुरस्कृत केले जाते. या वेळी दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार या अंतर्गत, शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी ओळखल्या गेलेल्या नऊ श्रेणींमधील पहिल्या तीन ग्रामपंचायतींना एकूण 27 पुरस्कार दिले जाणार आहेत. एकूण नऊ नानाजी देशमुख उत्कृष्ट पंचायत शाश्वत विकास पुरस्कार पहिल्या तीन गाव, गट आणि जिल्हा पंचायतींना देण्यात येत आहेत. तसेच ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार आणि कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार प्रत्येकी तीन सर्वोत्कृष्ट पंचायत क्षमता विकास संस्थेचा पुरस्कार ग्रामपंचायतींसाठी विशेष श्रेणीतील तीन संस्थांना दिला जाणार आहे. अशा प्रकारे पंचायत संस्थांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात एकूण 45 पुरस्कार प्रदान केले जातील.

श्री.गिरीष महाजन

एकूण कामगिरी

त्रिपुरा – ७,

ओडिशा – ७,

महाराष्ट्र – ६,

आंध्र प्रदेश – ४,

बिहार – ३,

हिमाचल प्रदेश – ३,

कर्नाटक – २,

केरळ – २,

लडाख – २,

आसाम – २,

तामिळनाडू – २,

उत्तर प्रदेश-2,

गुजरात- 1,

छत्तीसगड- 1,

तेलंगणा-1

1) दिनदयाल उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये स्वच्छ व हरित पंचायत म्हणून मौजे मोडाळे ता. इगतपुरी जि. नाशिक ही ग्रामपंचायत देशात तृतीय.

2) नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून मौजे मन्याचीवाडी ता. पाटण जि. सातारा ग्रामपंचायत देशात प्रथम.

3) नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये उत्कृष्ट पंचायत समिती म्हणून तिरोरा पंचायत समिती जि. गोंदिया पंचायत समिती देशात तृतीय.

4) ग्राम ऊर्जा स्वराज विशेष सवंर्ग पुरस्कारांतर्गत मौजे मन्याचीवाडी ता. पाटण जि. सातारा ग्रामपंचायत देशात प्रथम.

5) कार्बन न्युट्रल विशेष पुरस्कार श्रेणीमध्ये मौजे बेळा ता.जि. भंडारा ग्रामपंचायत देशात प्रथम.

6) पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार अंतर्गत पुणे येथील यशदा अकॅडमी देशात तृतीय