संकटातही संघटनशक्ती; पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय

महाराष्ट्र राजकीय

पुणे: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. विशेषतः पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल कसा लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती.

अजित पवार 9 फेब्रुवारीला ‘कमबॅक’ करणार, अशा आशयाचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच प्रत्यक्ष निवडणूक निकालांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं आहे. पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली आहे.

पुणे जिल्हा परिषद – आतापर्यंतचे निकाल

एकूण 73 जागांपैकी 55 जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 40 जागांवर विजय मिळवला आहे. उर्वरित 18 जागांचे निकाल अद्याप येणे बाकी आहेत.

पक्षनिहाय जागावाटप (आतापर्यंत):

राष्ट्रवादी काँग्रेस – 40

भाजप – 7

शिवसेना (शिंदे गट) – 4

ठाकरे गट – 3

शरद पवार गट – 1

तालुकानिहाय विजयी उमेदवारांची यादी

जुन्नर

डिंगोरे: सोनाबाई दाभाडे (राष्ट्रवादी)

ओतूर: छाया तांबे (राष्ट्रवादी)

बोरी बु.: कल्पना काळे (राष्ट्रवादी)

आळे: मंगेश काकडे (शिवसेना)

राजुरी: स्मिता कणसे (शिवसेना – शिंदे गट)

सावरगाव: गुलाबराव पारखे (शिवसेना ठाकरे गट)

बारव: मोनाली लांडे (राष्ट्रवादी)

नारायणगाव: नेहा पाटे (शिवसेना)

आंबेगाव

पारगाव तर्फे अवसरे: विवेक वळसे (राष्ट्रवादी)

कळंब: प्रीती थोरात (राष्ट्रवादी – शरद पवार गट)

शिनोली: शीला लोहकरे (राष्ट्रवादी)

अवसरी बु.: विष्णु हिंगे (राष्ट्रवादी)

घोडेगाव: सुवर्णा दरेकर (शिवसेना)

शिरूर

कवठे यामाई: राजेंद्र गावडे (भाजप)

न्हावरा: वृषाली वाळके (राष्ट्रवादी)

रांजणगाव गणपती: स्वाती पाचुंदकर (भाजप)

मांडवगण फराटा: सुजाता पवार

खेड

नाणेकरवाडी: गणेश बोत्रे (राष्ट्रवादी)

कुरळी: विनया मुंगसे (शिवसेना ठाकरे गट)

पाईट: सुनिता बुट्टे पाटील (राष्ट्रवादी)

मावळ

टाकवे बु.: अनंता पावसे (राष्ट्रवादी)

इंदुरी: पल्लवी दाभाडे (राष्ट्रवादी)

खरकाळे: दीपाली हुलावले (राष्ट्रवादी)

कुसगाव बु.: संतोष राऊत (राष्ट्रवादी)

सोमटणे: मनीषा मुरे (राष्ट्रवादी)

मुळशी

पिरंगुट: आबा शेळके (शिवसेना उबाठा)

हवेली

कोरेगाव मुळ: सुरेखा हरगुडे (राष्ट्रवादी)

पेरणे: किरण साकोरे (भाजप)

दौंड

खडकी: वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी)

वरवंड: गायत्री खळदकर

बोरी पारधी: तुषार थोरात (राष्ट्रवादी)

पुरंदर

गराडे: रुपाली झेंडे (राष्ट्रवादी)

बेलसर: अजय इंगळे (भाजप)

वीर: हरीभाऊ लोळे (भाजप)

निरा शिवतक्रार: प्राजक्ता दुर्गाडे (राष्ट्रवादी)

वेल्हे

विंझर: अमोल नलावडे (राष्ट्रवादी)

वेल्हे बु.: तानाजी मांगडे (राष्ट्रवादी)

भोर

कामथडी-भोंगवली: विक्रम खुटवड (राष्ट्रवादी)

भोलावडे: विठ्ठल आवाळे (भाजप)

बारामती

सूपा: पल्लवी खेत्रे (राष्ट्रवादी)

गुणवडी: शुभांगी शिंदे (राष्ट्रवादी)

इंदापूर

भिगवण: मेघना बंडगर (राष्ट्रवादी)

निमगाव केतकी: सोनाली जाधव (राष्ट्रवादी)