पोलीस पाटील भरती सुरु, अर्ज करा…

महाराष्ट्र

औरंगाबाद: छ. संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरले जाणार असून, याबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आदेश काढले आहेत. छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 384 पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी एक पत्र काढले आहेत. यासाठी 21 फेब्रुवारीपासून अर्ज मागवने सुरू झाले असून 29 मार्चला यासाठी लेखी परीक्षा होणार आहे. तसेच 15 एप्रिलला अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जेही उमेदवार पोलीस पाटील भरती 2023 ची आतुरतेने वाट बघत आहेत ते या भरती करीता अर्ज करू शकता.

छ. संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, छ. संभाजीनगर जिल्हयातील पोलीस पाटलांची 384 एवढी पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठया संख्येने पदे रिक्त असल्या कारणाने गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.

त्यामुळे अशी अडचण निर्माण होऊन गावातील अपराधाचे प्रमाण वाढु नये, गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ व शांतता अबाधित राहिल, नैसर्गिक आपत्ती सारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता येण्यास मदत होईल, यादृष्टीकोनातून पोलीस पाटीलांची सदर रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. या करीता जिल्हयामध्ये एकसूत्रीपणा असावा या दृष्टीकोनातून पोलीस पाटील भरतीचे वेळापत्रक ठरवून देणे योग्य वाटत असल्याने महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम 1967 चे कलम 3 नुसार प्राप्त अधिकारानुसार पोलीस पाटील भरतीचे निर्देश देत असल्याचं जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.