महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी! अजित पवारांच्या निधनानंतर शिंदे गटाच्या निर्णयांमुळे महायुतीत वाद

महाराष्ट्र राजकीय

मुंबई:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गोंधळ सुरु आहे. त्यांच्या निधनामुळे राज्य अजूनही शोककळेत आहे, असा उल्लेख करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे म्हणाले, “अजित पवार यांच्या निधनामुळे झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. ९ फेब्रुवारीला कोणताही कार्यक्रम किंवा सोहळा आयोजित करू नये, असेही मी आवाहन करतो.”

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ आणि महायुतीतील वाद

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. कदमांच्या मते, “सुनीत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला भाग पाडण्यात आले.” यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आणि हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगितले.

एमआयएमच्या नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी

अमरावती महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या नगरसेविकेने भाजपाच्या उमेदवारांना मतदान करून पक्ष नियम मोडल्याची घटना घडली. एमआयएमने तत्काळ कारवाई करत संबंधित नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी केली. हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेविकेचे नाव मीरा कांबळे असून त्या बडनेरा जुनी वस्ती प्रभागातून निवडून आल्या होत्या.

शरद पवारांच्या नगरसेवकाचा शिंदे गटाला पाठिंबा

मुंबई महापालिकेतील राजकीय घडामोडीत शरद पवार पक्षाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. रावराणे यांनी आपल्या प्रभागातील विकास कामांसाठी निधी देण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा पाठिंबा दिला, परंतु त्यांनी पक्ष सोडणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे ठाकरे गटाच्या राजकीय तिढ्यात वाढ झाली असून महापालिकेतील सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत महायुतीतील वाद

नवी मुंबई महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. भाजपाने युती धर्म न पाळल्याची टीका शिंदे गटाने केली आहे. महापौरपदासाठी भाजपच्या सुजाता पाटील आणि उपमहापौरपदासाठी दशरथ भगत यांची बिनविरोध निवड झाली, मात्र पक्षांमधील राजकीय संघर्ष आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे महापालिकेतील सत्तासंघर्ष अजूनही कायम आहे.