लिप्ट दिलेल्या कारचालकाने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग, पोस्कोसह इतर गुन्हे दाखल

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): गोलेगाव (ता. शिरुर) येथुन शिरुरला शाळेत जाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीने एका अज्ञात कार चालकाला लिप्ट मागितल्याने ती कारमध्ये पुढच्या बाजूस बसली असता सदर कार कार चालकाने ‘तु आमच्या सोबत चल आम्ही तुला पैसे देवु ‘असे म्हणत तिच्या बरोबर अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याने त्या अज्ञात कारचालकाविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगासह बाललैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोलेगावातून शिरुर येथे शाळेला येण्याकामी एका मुलीला कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने (दि.१७) फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजल्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे गोलेगाव ते शिरुर या रोडवर शाळेत जाण्यासाठी एकटीच ऊभी राहून वाहनाची वाट पाहत होती. त्यावेळी तिला गोलेगावकडुन एक पांढऱ्या रंगाची कार आलेली दिसली. तेव्हा त्या गाडीला हात केला असता गाडी तिच्याजवळ येवुन थांबली. त्या कारमध्ये एक २० ते २५ वर्ष “वेळ” वयोगटाचा एक मुलगा ड्रायव्हर सीटवर बसलेला होता. व २५ ते ३० वयोगटाची एक मुलगी मागच्या सीटवर बसलेली होती.

तेव्हा तिने त्यांना मला शिरुर ला सोडता का? म्हणून विचारले असता त्यांनी होकार दिल्याने ती मागे बसु लागली असता पाठीमागे बसलेली मुलगी तीला म्हणाली की ‘पुढच्या सीटवर बस’ त्यामुळे सदरची मुलगी पुढच्या सीटवर बसली. कारमधून थोडे पुढे आलो असता त्या अनोळखी मुलाने मांडीवर हात ठेवून तिच्या मनास लाज वाटेल असे चोळू लागला लागला व ‘तु आमच्या सोबत चल आम्ही तुला पैसे देवु असे असे म्हणु लागला. तेव्हा तिने त्यांना गाडी थांबवण्यास सागितले असता ते कार थांबवित नसल्याने ती आरडाओरड करु लागली.

त्यामुळे त्यांनी शिरुर येथील गोलेगाव पुलाजवळ कार थांबविली. व ती उतरत असतानाच ती अनोळखी मुलगी तिला म्हणाली की ‘ तुला लय गुदगुल्या झाल्याय का’ असे म्हणत असतानाच ती कार मधुन खाली उतरुन कारचा नंबर पाहीला असता तो MH.१६ CY ७०१४ असा होता. ती कार तेथून डाव्या साईडला टर्न मारुन पुणे हायवे रोडला गेली. त्यानंतर ती घाबरली. तीने वडीलांना फोनवरुन घडलेली हकीकत सांगून वडिलांसमवेत शिरुर पोलिस स्टेशनला येऊन या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले ह्या करत आहे. त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या कारचालकाला व त्याला सहाय्य करणाऱ्या स्त्रीला गजाआड करण्याचे आव्हाण शिरुर पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.