बीट स्तरीय स्पर्धेत सादलगाव अव्वल

शिरूर तालुका

मांडवगण फराटा (संपत कारकूड): यशवंतराव कला-क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत न्हावरे बिट स्तरीय स्पर्धेत सादलगाव येथे (दि. १८) नोव्हेंबर रोजी झालेल्या क्रीडा स्पर्धेत सादलगाव जि. प. शाळेने मुले आणि मुलींच्या सांघिक स्पर्धेत खो-खो मध्ये लहान व मोठ्या या दोन्ही गटात विजेतेपद घेतले असून या शाळेला आता केंद्र स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या खामकर, विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरुर या स्पर्धेत उपस्थित होत्या.

सादलगाव येथे प्रथमच पार पडलेल्या या स्पर्धेत बिट स्तरावर एकूण ८२ शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ५०० मुले-मुलीनीं तर 100 शिक्षकांनी सहभाग घेतला होता. विविध क्रीडा प्रकार आणि त्यामध्ये लहान- मोठा गट असे या स्पर्धेचे स्वरुप होते. प्रत्येक स्पर्धेत मोठी चुरस होती. अत्यंत चांगली तयारी करुन प्रत्येक शाळेने आपआपले विद्यार्थी मैदानात उतरविले होते. विशेष करुन सांस्कृतिक कार्यक्रम, भजन स्पर्धा, वक्तृव स्पर्धानी तर सर्व रसिकांची मने जिंकली. केंद्रप्रमुख वडगाव रासाई वेताळ साहेब, केंद्रप्रमुख तांदळी घुमरे, मुख्याध्यापक वडगाव रासाई ठोंबरे आदी पाहुणे उपस्थित होते.

शाळेतील शिक्षक जगन्नाथ कदम, अतुल कांडगे, शब्बीर शेख, गंगाधर काळे यांनी तर गावचे सरपंच हरिभाऊ चांदगुडे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कांतीलाल होळकर, माजी सरपंच संतोष जगताप, शिक्षक प्रेमी महादेव होळकर, खो-खो कोचर भरत अडसूळ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अलका माने, तंटामुक्तीत समितेचे माजी अध्यक्ष संतोष पवार, आजी-माजी विधार्थी यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि देणगीदार यांनी हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

बाहेरगावरुन आलेल्या सर्व मुलांसाठी ग्रामस्थांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली तर पिण्याच्ये पाण्याची व्यवस्था गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड यांनी केली होती. गावातील ग्रामस्थांनी स्पर्धा पाहण्यास मोठी गर्दी केली होती.

गावचे सरपंच हरिभाऊ चांदगुडे यांनी या स्पर्धेतील सांघिक खेळात प्रथम येणाऱ्यास 1 हजार रुपयांचे तर वैयक्तिक प्रथम क्रमांकास 100 रुपयांचे रोख बक्षीस दिले. जेवण सोमनाथ साठे आणि ग्रामस्थांतर्फे करण्यात होते.