त्या पत्रकाराला शिविगाळ व मारण्याची धमकी देणाऱ्या सत्ताधारी शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचा तीव्र निषेध

महाराष्ट्र

मुंबई: रविवारी ठाण्यात “सावरकर गौरव यात्रेचे वृत्तांकन  करणारे लोकमतचे  पत्रकार रणजित इंगळे यांना मारहाणीची धमकी देण्यात आली. धमकी देणारे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे खासमखास) मुख्यमंत्र्यांच्या लवाजम्यात  सर्वत्र  पिए म्हणून वावरणारे राहूल लोंढे आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के या प्रवक्त्यांकडून शिविगाळ व कार्यकर्त्यांकडून मारण्याची घमकी देण्यात आली तसेच पत्रकार रणजित  इंगळे यांना गौरव यात्रेचे वृत्तांकन न करण्यास सुनावले गेले. ही अत्यंत निंदनीय घटना असून एनयुजेमहाराष्ट्र व मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया याचा तीव्र निषेध करत आहे, अशा प्रकारे प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींना धमकावणे, काम करताना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत.

सत्तेत असणाऱ्यांना आपल्या सोईची बातमी हवी असते. त्यांच्या सोईचे हिताचे प्रश्न  विचारणे, बातम्या देण्याची आग्रही भूमिका घेताना पत्रकारांना धमकावणे भीतीचे वातावरण तयार करणे हे प्रकार वाढले आहेत. ही खूपच गंभीर बाब आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे आमची आग्रहाची मागणी की,” संबंधितावर तातडीने पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी आणि त्यांची या जबाबदारीच्या प्रवक्ते, पीए पदावरून हकालपट्टी करावी” अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स महाराष्ट्र  आणि मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया करीत आहे. अध्यक्ष शीतल करदेकर, सरचिटणीस डॉ.सुभाष सामंत, डॉ. अब्दुल कादीर, वैशाली आहेर, लक्ष्मीकांत घोणसे पाटील, शेखर धोंगडे, लक्ष्मण खटके,विश्वनाथ येल्लुरकर, वैजंता मोरे,चेतन काशीकर, संदिप टक्के, विष्णू कदम, भरत मानकर, प्रविण वाघमारे आदिक दिवे, लक्ष्मण आढाव, संदिप रणपिसे समस्त पदाधिकारी उपस्थित होते.