सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री! मनोज जरांगे पाटलांचा मोठा इशारा; त्या ‘गिधाडांवर लक्ष ठेवा’…

महाराष्ट्र

मुंबई: आज सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी शपथविधी पार पडली. राज्यपालांच्या हस्ते राजभवनात त्यांनी पदाची शपथ घेतली. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत त्यांना गटनेता म्हणूनही निवडण्यात आले होते.

शपथविधीनंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, “सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, हा चांगला विषय आहे. अजित पवार यांच्या जागेवर त्यांचाच माणूस हवा होता.”जरांगे पाटीलांनी सुनेत्रा पवार यांना सल्ला दिला: “सर्वांना सोबत घेऊन चालावे. अचानक जमलेल्या ढेकणांवर लक्ष ठेवा. गिधाड आता घिरट्या घालायला लागले आहेत. पवार कुटुंबासोबत राहणे फायदेशीर ठरेल, कारण हे ढेकण खूप रक्त पिऊ शकतात.”

दरम्यान, शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. जरांगे पाटील म्हणाले, “हा त्यांचा राजकीय डावपेच असू शकतो. सुनेत्रा पवार यांनी सर्वांना घेऊन चालावे.”