देशाच्या पहिल्या महिला इंजिनिअर कोण होत्या?

महाराष्ट्र

मुंबई: इंजिनीअर्सने देशासाठी दिलेल्या योगदानाच्या गौरवार्थ दर वर्षी देशात १५ सप्टेंबरला इंजीनिअर्स डे साजरा केला जातो. देशातील महान इंजिनीअर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म दिवस म्हणून त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यांनी आधुनिक भारताचे निर्माण केले व देशाला नवे रुप दिले. अनेक नद्यांसाठी बांध आणि पूल बनवले. त्यामुळेच देशाला अनेक मोठे आणि कर्तबगार इंजिनीअर मिळाले. पण रस्ते, बांध किंवा आधुनिक भारताच्या निर्माण मध्ये केवळ पुरुषांचेच नाही तर महिलांचे योगदानही महत्वपूर्ण आहे.

आज अनेक महिला इंजिनीअर देशाचा मान वाढवत आहे. पण तुम्हाला महित आहे का, देशाच्या पहिल्या महिला इंजिनीअर कोण होत्या? त्याकाळात इंजीनिअर होण्याचे स्वप्न बघितले आणि ते पूर्णही केले, कसे उचलले असेल हे पाऊल? जाणून घेऊ

कोण आहे पहिली महिला इंजिनीअर?

भारतातील पहिल्या महिला इंजिनीअर ए. ललिता या आहेत. त्या इलेक्ट्रिकल इंजिनीअर होत्या. ज्यावेळी त्या इंजिनीअर झाल्या त्या काळात महिलांना शिकायला परवानगी नसायची. महिलांनी चुल आणि मुलपर्यंत सिमीत राहावे असे मानले जायचे. अशा काळात शाळेत जाणे, इंजिनीअर होणे हा फार मोठे पाऊल होते. त्यांचे नाव अय्योलासोमायाजुला ललिता होते. त्यांचा जन्म २७ ऑगस्ट १९१९ मध्ये चेन्नईला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पप्पू सुब्बा राव होते. ते इलेक्ट्रिकल इंजीनिअरींगचे प्रोफेसर होते. त्यांना ४ मोठी भावंडे होते. तर त्यांच्यानंतर दोन लहान भाऊ-बहिण होते. या कुटूंबात मुलांना इंजीनिअर बनवण्यात आले तर मुलिंना केवळ जूजबी शिक्षण देण्यात आले होते. ए ललिता यांचे तीन भाऊ इंजीनिअर होते.

त्यांचे लग्न १५ व्या वर्षी झाले

जेंव्हा त्या १५ वर्षांच्या होत्या तेव्हाच त्यांचे लग्न झाले. लग्नाच्यावेळी त्या मॅट्रिक पास होत्या. लग्नानंतर एक मुलगी झाली. सर्व व्यवस्थित सुरू होते. पण त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आणि त्या विधवा झाल्या. लहान मुलगी आणि त्या याची त्यांना चिंता वाटत होती. मुलीचे दुःख ओळखून वडिलांनी माहेरी बोलावून घेतले. त्यांच्या आयुष्याचा नवा काळ सुरू झाला. मुलीचे आणि स्वतःचे आयुष्य नव्याने सुरू करण्यासाठी त्यांनी पुन्हा शिक्षण घेण्यास सुरूवात केली. वडिल आणि भावांसारखे त्यांनाही ९ ते ५ ची नोकरी करायची होती. इंजिनीअरींगचा प्रभाव त्यांच्यावर होता. म्हणून त्यांनी त्याची तयारी सुररु केली.

ए ललिता यांचे शिक्षण

कुटूंबाच्या सपोर्टने मद्रास कॉल्ज ऑफ इंजिनीअरींगमध्ये प्रवेश घेतला. त्याकाळात मुलिंसाठी इंजिनीअरींग कॉलेजमध्ये होस्टेल नव्हते. त्यांच्यासोबत अजून दोन मुलिंनी इंजिनीअरींगसाठी प्रवेश घेतला आणि तिघींनी हॉस्टलमध्ये राहून १९४३ मध्ये डिग्री घेतली. आणि पहिली महिली इंजिनीअर झाल्या.

ए ललिता यांचे करिअर

बिहारच्या जमालपूरमध्ये रेल्वे वर्कशॉपमध्ये ॲप्रेंडिसशीप केली. सेंट्रल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ऑफ इंडियामध्ये इंजिनीअरींग असिस्टंटच्या पदावर काम केले. लंडनमधून इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनीअर्स मधून ग्रॅज्यूएट झाल्या. आणि वडिलांसोबत रिसर्च कामाला लागल्या. त्यांनी बऱ्याच ठिकाणी काम केल्यावर भाखडा नांगल बांधच्या जनरेट प्रोजेक्टमध्ये सहभागी होत्या. १९६४ मध्ये आयोजित पहिल्या इंटरनॅशनल काँफरंस ऑफ वुमन इंजिनीअर अँड सायंटिस्ट कार्यक्रमात बोलवण्यात आले. वयाच्या ६० वर्षी १९७९ मध्ये त्यांचे निधन झाले.