anjana-jagtap

स्कार्फ मळणीयंत्रणात अडकले अन् क्षणात महिलेचे मुंडके झाले धडावेगळे…

महाराष्ट्र

बीड : मशिनवर ज्वारीची मळणी करत असताना डोक्याला बांधलेले स्कार्फ मळणीयंत्रात अडकल्यामुळे महिलेचे मुंडकेच धडावेगळे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका क्षणात महिलेचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पाटोदा तालुक्यातील डोमरी येथे दुपारी ही घटना घडली आहे. अंजना श्रीधर जगताप (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. सध्या ज्वारी, सोयाबीनचे खळे करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. यासाठी मळणीयंत्र लावले जाते. त्यातच उन्हाचा चटकाही जाणवत असल्याने काम करताना महिला, पुरुष डोक्याला रूमाल, स्कार्फ बांधत असतात. हेच डोक्याला बांधलेले स्कार्फ एका महिलेच्या जिवावर बेतले आहे.

अंजना श्रीधर जगताप या काम करताना अचानक डोक्याचे स्कार्फ सुटले आणि मळणीयंत्रात अडकले. यामुळे वेगाने सुरू असलेल्या यंत्रणाने अंजना जगताप यांना खेचले. यात यंत्रात मुंडके अडकल्याने धडावेगळे झाले. काही समजण्याच्या आतच या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर नातेवाइकांनी आक्रोश केला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता डोमरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

विहिरीत आढळला विद्यमान सरपंच महिलेचा मृतदेह…

रांजण खळग्यात पाय घसरुन पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर सापडला   

शिरूर तालुक्यात विहिरीत आढळला महिलेचा व चिमुकल्याचा मृतदेह…

शिरुर तालुक्यात वेश्या व्यवसाय करणा-या तिघांविरुध्द गुन्हा दाखल; पोलिसांनी केली एका महिलेची सुटका

शिरुर तालुक्यात गुन्हेगारी वाढल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात…? पोलिस ‘सिंघमगिरी’ दाखवणार का…?