नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांचे शिष्य अशोक सराफ ही ओळख  कायम रहावी; अशोक सराफ

महाराष्ट्र

मुंबई: “आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे की, आज माझ्या मामांचं माझे गुरु. अभिनय करताना तू काय करू शकतोस काय करायला पाहिजे, कसा करशील हे अगदी मुळापासून त्यांनी शिकवलं आणि मी त्यांच्याकडून एकलव्यासारख ते सबंध आत्मसात करून घेतले, त्या माझ्या गुरूंचा, माझे नाटकातले सुद्धा गुरु माझे  सख्खे मामा गोपीनाथ सावकार यांच्या आज इकडे तैलचित्राचे उद्घाटन झालं ही माझ्या दृष्टीन आनंदाची गोष्ट आहे, “असे आनंदोद्गार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी काढले. ते पुढे म्हणाले”त्यांची स्मृती  कायम राहावी या दृष्टीने कायम प्रयत्न केले गेले पाहिजे. आता त्यांच्याबद्दल  माहिती असणारी माणसं फार कमी आहेत असं मला वाटतं. त्या वेळेचा काळ फार वेगळा होता. नाटक सृष्टी डबघाईला  येत होती.

संगीताची आवड असून सुद्धा प्रेक्षक येत नव्हते, असा एक काळ होता. नाटककंपन्या नव्हत्या अशा वेळेला इनमीन चार कंपन्यांनी फक्त ही मराठी नाट्यसृष्टी तगुन ठेवली होती. त्यांनी लोकांना मराठी नाट्यसृष्टी संगीत नाट्यसृष्टी काय आहे त्याची जाणीव वारंवार लोकांना करून दिली होती त्यातले एक म्हणजे गोपीनाथ सावकार. ही संगीत नाटके जिवंत ठेवण्याचे हे त्यांनी काम केलं त्यामुळे त्याची स्मृती ही कायम राहिली पाहिजे असं मला वाटतं. आज आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली आहे, ती म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर, लता दीदी यांच्या तैलचित्राचे पण अनावरण झालं. फार सुंदर गोष्ट आहे आणि एक फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्यावेळी लतादीदींनी काम करायला सुरुवात केली सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये पहिल्यांदा स्वर्गीय मास्टर विनायकांच्या कंपनीत काम सुरू केले.

मास्टर विनायकांच्या कंपनीत त्या सिनेमांमध्ये काम केले त्यावेळी त्यांचं  वय काहीतरी आठ दहा वर्षाचे असेल. त्या वेळेला मास्टर विनायकांना माझे मामा गोपीनाथ सावकार हे असिस्टंट होते. त्या बॅनरखाली हा  मंगळागौर  सिनेमा आला. नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या तैलचित्राचे अनावरण शिवाजी मंदिर येथे नुकतेच करण्यात आले.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्यातील चित्राचे अनावरण श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाचे  इमारतीत करण्यात आले या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी रंगभूमीसाठी काम करणाऱ्या अशा दिग्गजांच्या आठवणी जतन केल्या पाहिजेत’ असे आवाहन केले आणि आपल्या गुरुच्या आठवणींना उजाळा दिला. “हे तैलचित्र अशोक सराफ यांच्या मामाचे असं बोलले गेलेले अर्थात ते स्वाभाविकच आहे पण त्याऐवजी गोपीनाथ सावकार यांचे अशोक सराफ भाचे आहेत ही देखील ओळख तितकीच महत्त्वाची आहे, असे सांगतानाच अशोक सराफ भाऊक झाले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ट्रस्ट’ च्या वतीने व पुढाकाराने ज्येष्ठ गायिका उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते  नाट्यरसिक भारतरत्न लता मंगेशकर यांचे तैलचित्राचे अनावरण केले गेले याचवेळी गोपिनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी च्या सहयोगाने ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या तैलचित्रचे अनावरण त्यांचे भाचे जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नाट्य संमेलन अघ्यक्ष प्रेमानंद गज्वी ही उपस्थित होते. तसेच मराठी नाट्य व्यावसायिक  निर्माता संघाचे संतोष काणेकर,राहूल भाडारे, कार्यक्रम समिती प्रमुख प्रदीप कबरे, शिवाजी महाराज स्मारक ट्रस्टचे अण्णासाहेब सावंत, विश्वस्त ज्ञानेश महाराव आणि नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांचे भाचे सुभाष सराफ रंगमंचावर उपस्थित होते.

नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांचे नाव पु ल देशपांडे अकादमीतील, मिनी थिएटरला देण्याची मागणी अजून दुर्लक्षित का असा प्रश्न वर्तमान सांस्कृतिक मंत्री व मुख्यमंत्री यांना विचारावासा वाटतो. नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांची मराठी नाट्यपरंपरा,  सुवर्ण काळातील नायक असल्याची तपस्या दुर्लक्षित  करून चालणार नाही.

संगीत नाटकांमध्ये नवी उर्जा भरणारे निर्माते दिग्दर्शक अभिनेते म्हणून त्यांचे कार्य हे लाख मोलाचे आहे गोपीनाथ सावकारांचा जीवनपट म्हणजे एका नटसम्राटाची शोकांतिकाच. त्यांच्याकडे कुठलाही मान सन्मान फिरकला नाही. त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली नाही. त्यांनी त्यांच्या नाटकांत अनेक कलाकारांना ना भूमिकाही दिल्या , अनेक लेखकांना संधी देत रंगकर्मीची एक पिढी घडवली.

शेवटच्या काळात आजाराने त्यांना गाठले पायाला गॅंग्रीन झालेले. पाय कापलेला असताना लाकडाचा पाय लावून त्यांनी “उद्याचा संसार” नाटकात बैरिस्टर विश्रामची भूमिका केली, असे नष्टश्रेष्ठ होणे नाही.  त्यांची दखल सरकार घेईल तेव्हा घेईल, मात्र छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ट्रस्ट’च्या नियामक मंडळाने नाट्यगृहाच्या इमारतीत त्यांचे तैलचित्र लावले. त्यासाठी ट्रस्ट’चे सरचिटणीस अण्णासाहेब सावंत व विश्वस्त ज्ञानेश महाराव यांचे विशेष आभार व अभिनंदन