भर उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहावे लागणार
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) कडून २०२४-२५ शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ५ एप्रिल ते २३ एप्रिल २०२५ दरम्यान सकाळी ८ ते ११ या वेळेत परीक्षा घेतली जाणार असून, यंदा पहिल्यांदाच सर्व शाळांमध्ये परीक्षा एकाच वेळी होणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे
परीक्षा कालावधी: ५ ते २३ एप्रिल २०२५
वेळ: सकाळी ८ ते ११
निकाल जाहीर: १ मे २०२५
फेरपरीक्षा: जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी
परीक्षेनंतरही शाळा बंधनकारक
यापूर्वी परीक्षा संपल्यानंतर अनेक विद्यार्थी शाळेत येत नसत. मात्र, यंदा २५ एप्रिलपर्यंत शाळेत हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे.
उत्तरपत्रिका तपासणी आणि निकालाची जबाबदारी
५ वी ते ८ वीच्या उत्तरपत्रिका जतन कराव्या लागणार, कारण त्यांची डायट किंवा शिक्षण विभागाकडून तपासणी केली जाऊ शकते.
परीक्षा कोणत्या दिवशी, कोणता विषय
७ एप्रिल: नववीचा इंग्रजी विषयाचा पेपर
८ एप्रिल: पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी (पॅटर्न) परीक्षा
९ एप्रिल: सहावीचा गणित, आठवी व नववीचा इंग्रजी (पॅटर्न) पेपर
११ एप्रिल: सहावी व नववीचा इंग्रजी पेपर, आठवीचा गणित (पॅटर्न) पेपर
१२ एप्रिल: सर्व वर्गांसाठी इंग्रजी, हिंदी आणि गणित परीक्षा
१५ एप्रिल: सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि गणिताचा पेपर
१६ एप्रिल: सहावीच्या समाजशास्त्र, आठवीच्या गणित आणि नववीच्या विज्ञान भाग-१ ची परीक्षा
१७ एप्रिल: पाचवीच्या परिसर अभ्यास, सहावीच्या चित्रकला, आठवीच्या हिंदी आणि नववीच्या विज्ञान भाग-२ ची परीक्षा
१९ एप्रिल: सहावीच्या गणित (पॅटर्न), आठवीच्या विज्ञान, नववीच्या गणित भाग-२ (पॅटर्न) परीक्षा
२१ एप्रिल: सहावीच्या गणित (पॅटर्न), आठवीच्या समाजशास्त्र, नववीच्या हिंदी विषयाची परीक्षा
२२ एप्रिल: पाचवी व सहावीच्या शालेय शिक्षण, आठवीच्या चित्रकला, नववीच्या इतिहासाची परीक्षा
२३ एप्रिल: सहावीच्या इंग्रजी (पॅटर्न), आठवीच्या शालेय शिक्षण, नववीच्या भूगोलाची परीक्षा
परीक्षेचा निकाल १ मे रोजी लावावा लागणार असल्याने शिक्षकांना त्वरित उत्तरपत्रिका तपासून निकाल तयार करावा लागेल.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जूनपूर्वी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.